शिवसेनेनंतर पवार कुटुंबात फूट पाडण्याचा डाव ; रोहित पवार

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि .१८ ऑक्टोबर । शिवसेना पक्षफोडल्यानंतर आता विरोधकांचे पुढील टार्गेट राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असल्याचा खळबळजनक दावा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कर्जत-जामखेडचे आमदार रोहित पवार यांनी केला आहे. यासाठी पवार कुटुंबात फूट पाडण्याचा विरोधकांचा डाव असल्याचेही रोहीत पवार म्हणाले. एबीपी माझा या वृत्त वाहिनीला दिलेल्या प्रतिक्रीयेत ते बोलत होते. दरम्यान, यावर विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनीही प्रतिक्रीया दिली आहे.

रोहित पवार यांच्या दाव्याने खळबळ

दोन महिन्यापूर्वी शिवसेना पक्षात उभी फूट पडल्याने ठाकरे कुटुंबाला मोठा धक्का बसला होता. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी 40 आमदारांसह बाहेर पडून भाजपशी हातमिळवली केली होती. यामुळे उद्धव ठाकरे यांनी आपला राजीनामा द्यावा लागल्याने महाविकासआघाडी सरकार कोसळलं होतं. या सर्व घडामोडीनंतर शिंदे गट आणि भाजपने एकत्र येत राज्यात सरकार स्थापन केले. दरम्यान, पक्षात फूट पडल्यानंतर ठाकरे कुटुंबात देखील फूट पडल्याचं पाहायला मिळालं. ठाकरे कुटुंबातील अनेक सदस्य शिंदे गटाच्या स्टेजवर पाहायला मिळाले. यानंतर आता पवार कुटुंबाताही अशीच फूट पाडण्याचा दावा आमदार रोहित पवार यांनी केला आहे.

शिवसेना पक्षानंतर आता विरोधकांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट पाडण्याचा डाव असल्याचा आरोप रोहीत पवार यांनी केला आहे. विरोधक पवार कुटुंबात फोडण्याचा प्रयत्न करत असल्याचेही ते म्हणाले. मात्र, काहीही झाले तरी पवार कुटुंबात फूट पडणार नसल्याचा विश्वास रोहित पवार यांनी व्यक्त केला आहे. खासदार सुप्रिया सुळे केंद्रात आहेत, विरोधी पक्षनेते अजित पवार आणि आम्ही राज्यात आहोत, त्यामुळे संघर्ष होण्याचं कारण नसल्याचं रोहित पवार यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *