Weekly Horoscope : चालू सप्ताह आपणास कसा जाईल? पहा राशिभविष्य

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि .२३ ऑक्टोबर ।

मेष
परदेश गमन, सन्मान मिळेल. पराक्रमात वाढ होईल .तुमच्या हाताने काही भरीव कामगिरी होईल. राशीच्या तृतीय स्थानात येणारा राशी स्वामी मंगळ सामाजिक बंधन पाळा असे संकेत देत आहे. राशीच्या शष्ठ स्थानात चंद्र सुरुवातीला सुखद घटना घडवेल. रवि बुध संततीला आर्थिक लाभ मिळवून देईल . व्यवसाय, जोडीदाराला शुभ काळ. लाभदायक घटना घडतील. स्त्रीवर्गाची मदत मिळेल. आई वडिलांच्या प्रकृतीची काळजी घ्या. सप्ताह अनुकूल.

वृषभ
सप्ताह चांगला.व्यय राहू आणि सप्ताहाच्या सुरवातीला पंचम स्थानात असणारा चंद्र मनाची घालमेल करविल. लाभ स्थानातील गुरू कार्यक्षेत्रात लाभ मिळवून देईल . अधिकारी व्यक्तींची गाठभेट होईल. लेखक पत्रकार व्यक्तींना उत्तम काळ आहे .भाग्य साथ देईल. सुर्य आणि शुक्र एकत्र आहेत. घरामध्ये सांभाळून रहा.

मिथुन
सप्ताह मिश्र फळ देईल. ग्रह संकेत ओळखून कुठलेही प्रवास अनावश्यक धाडस टाळा. कार्यक्षेत्रा मंगळ शुभ समाचार देईल. शनि माहात्म्य किंवा सुंदरकांड वाचणे योग्य असेल. दशम स्थानातील गुरू अधिकारी व्यक्तीकडून लाभ मिळवून देईल. कला क्षेत्रात चांगली कामगिरी कराल. व्यय राहू परदेश संबंधी शुभ समाचार देईल.

कर्क
सप्ताह एकूण मध्यम आहे. सामाजिक जीवनात अनेक गोष्टींमुळे आपण चर्चेत असाल. काही गोष्टी मनाविरुद्ध घडल्या तरी खचून जाऊ नका. व्यय मंगळ असून सध्याचा काळ हा आपला नाही. आहे ते टिकवून ठेवण्याची गरज आहे. जोडीदार जरा आक्रमक होण्याची शक्यता आहे. राशीतील ग्रह व्यवसाय वृद्धी करतील.

सिंह
व्यवसायात उत्तम संधी मिळेल. शत्रू पराजित होतील. सप्ताहाची सर्वात मोठी गोष्ट म्हणजे चंद्र कन्या राशीतून भाग्यकरक घटनांची सुरुवातीपासूनच चाहूल देईल. वैवाहिक जीवनासाठी महत्वाचा आठवडा आहे. अधिकरप्राप्ती होईल. बदल घडून येणार आहे. अष्टम गुरू सावध गिरी बाळगा असा इशारा देत आहे. आनंदात दिवस घालवा.

कन्या
भाग्य आणि धर्म दोन्ही क्षेत्र शुभ फळ देतील . सप्तम स्थानातील गुरू विवाहा साठी शुभ असून नवीन प्रस्ताव येतील.संतान चिंता दूर होईल. धार्मिक बाबतीत शुभ फळ मिळणार असून आर्थिक लाभ होतील. व्यवसाय धंद्यासाठी अनुकूल घटना घडतील. धन शुक्र आर्थिक भरभराट होईल.उत्तरार्ध शुभ जाईल.

तुला
संततीला भरघोस यश मिळेल.नोकरी मध्ये शुभ वार्ता कानी पडतील. चंद्राचे भ्रमण राशी स्थानातून होत आहे गृह क्षेत्रात नवी जबाबदारी घ्यावी लागेल .काही कामानिमित्त प्रवासाचे योग येतील. श्वासासंबंधी विकार असतील तर वेळीच काळजी घ्या. भाग्यातील मंगळ प्रवास योग आणेल. शैक्षणिक क्षेत्रात मोठी कामगिरी कराल.आठवडा शुभ आहे.

वृश्चिक
जोडीदाराला अधिकार प्राप्ती होईल. आनंदी राहण्याचा प्रयत्न करा. शनि भावंडांशी काही तणाव निर्माण करील.मात्र फारशी हानी न करता त्यातून मार्ग काढतील.घर आणि वाहन घेण्या संबंधी हालचाल कराल. त्यात नक्की यश मिळेल.प्रकृती जपणे गरजेचे आहे. मनाला अकारण नीरस वाटेल. योग आणि व्यायाम करा. सप्ताह मिश्र फळ देईल.

धनु
आर्थिक ताणतणाव, कौटुंबिक अडचणी याने त्रस्त व्हाल. प्रवास आणि त्यातून होणारे नुकसान मिळवून देणारा आठवडा आहे. बंधू भेट संभवते. भावंडाना यश कीर्ती देणारा काळ असून संततीच्या सुखाची कामना कराल. घराचे योग येतील. शत्रू पराजित होतील. आठवडा फलदायी ठरेल.

मकर
राशीत शनि ताण निर्माण करेल. शनि मंगळ षडाष्टक योगाचे प्रभाव दिसून येतील. गुरू आकस्मिक फळ देण्यास तयार आहे. घर आणि वाहन यासंबंधी काही निर्णय घ्याल. आर्थिक लाभ संभवतात. प्रवास योग येतील. बुध रवि कुटुंबात वाढ करेल.सप्ताह आनंदात घालवा.

कुंभ
व्यय स्थानात आलेला मार्गी शनि कुंभ व्यक्तीसाठी खर्चाची बातमी घेऊन येईल. विवाहाचे प्रस्ताव येतील. गुरू महाराज ते पार पडण्यास मदत करतील. तुमच्या साठी वेळ कायदा सुव्यवस्था राखण्याची आहे. कुठल्याही प्रकारचे आर्थिक देणेघेणे टाळा. नुकसान संभवते. धार्मिक ठिकाणी प्रवास होईल. सप्ताह शुभ आहे.

मीन
सप्ताहाची सुरुवात आर्थिक झाल्यामुळे संथ अशी होईल. शनि परदेश गमनाचे मार्ग मोकळे करील. लाभ दायक काळ असून सर्व मार्गांनी सावध राहून व्यवहार करा. मित्रं मैत्रिणीपासून धोका होऊ शकतो .धार्मिक बाबीत खर्च होईल. राशीतील गुरू शुभ फल देईल. सप्ताह मिश्र फळ देईल .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *