![]()
महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि .२३ ऑक्टोबर । अखेर बेस्ट कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड होणार आहे. बेस्टच्या कंत्राटी कामगारांनी विविध प्रलंबित मागण्या मान्य न झाल्यामुळे ऐन दिवाळीत आक्रमक पवित्रा घेत काल काम बंद आंदोलन केले होते. (Best Employee workers best bonus 7500 )
बेस्टच्या कंत्राटी कामगारांना ७५०० रुपयांचा बोनस मिळणार असून त्याबाबत कंत्राटी कंपनी मातेश्वरी ट्रान्सपोर्टच्या व्यवस्थापनाने लेखी आश्वासन दिल्याचं सांगण्यात आलं आहे.
मातेश्वरी ट्रान्सपोर्टच्या व्यवस्थापनाने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला (MNS) लेखी आश्वासन देऊन बेस्टच्या कंत्राटी कामगारांना आजपासून सानुग्रह अनुदान देण्याचे मान्य केल्यामुळे कर्मचाऱ्यांनी आंदोलन मागे घेतले आहे.