महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि .३१ ऑक्टोबर । नाशिक । पहाटे हवेत गारवा वाढला असून, दुपारी अचानक ऑक्टोबर हिट, दिवाळी खरेदीनिमित्त रस्त्यावरील वाढलेली गर्दी, अशा नानाविध कारणांमुळे रुग्णांची घरोघर संख्या वाढली आहे. त्यामुळे थंडी-तापाने घरोघर नागरिक फणफणत आहेत.
वातावरणात झपाट्याने बदल झाला आहे. आठवड्यापासून थंडीचा प्रभाव वाढत आहे. वातावरणातील बदलामुळे नागरिकांत आरोग्याच्या समस्या वाढल्या आहेत. थंडी-तापाच्या रुग्णांची संख्या वाढत आहे. घरोघर रुग्ण असल्याने सायंकाळी शहरातील ठिकठिकाणचे खासगी रुग्णालयांत गर्दी दिसून येत आहे. दिवाळी असल्याने महापालिकेच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या सुट्या व इतर कारणांमुळे महापालिकेच्या रुग्णालयाऐवजी खासगी रुग्णालयांत उपचारासाठी गर्दी दिसून येत आहे.
दिवस, रात्र, सकाळ, सायंकाळ अशारीतीने शिशिर वसंत असे सर्व ऋतू एकापाठोपाठोपाठ वारंवार येत असतात. काळाच्या खेळात माणसाचे आयुष्य व्यतीत होते, पण त्यातहून आशेचा प्राणवायू टिकून असते, म्हणूनच या बदलात आरोग्याचा विसर पडू नये हाच संदेश देणाऱ्या श्लोकाची अनुभूती सध्या शहरात येत आहे. वातावरणातील बदलाचा जनजीवनावर झपाट्याने परिणाम झाला आहे. त्यातून घरोघरी किरकोळ विकाराचे रुग्ण वाढल्याचे चित्र आहे.