महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । ५ नोव्हेंबर । T-20 विश्वचषकात शनिवारी सुपर-12 ग्रुप-1मध्ये इंग्लंडचा सामना श्रीलंकेशी होत आहे. श्रीलंकेचा कर्णधार दासुन शनाकाने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला आणि 20 षटकांत 8 गडी गमावून 141 धावा केल्या. पथुम निसांकाच्या बॅटमधून सर्वाधिक धावा आल्या, त्याने 45 चेंडूत 67 धावांची खेळी केली. तर भानुका राजपक्षेने 22 चेंडूत 22 धावा केल्या.
श्रीलंकेचा संघ आधीच उपांत्य फेरीच्या शर्यतीतून बाहेर पडला आहे. इंग्लंडसाठी हा करा किंवा मरा असा सामना आहे. इंग्लंड जिंकल्यास उपांत्य फेरीत प्रवेश करेल.इंग्लंड पराभूत झाल्यास या गटातील दुसरा संघ म्हणून ऑस्ट्रेलिया अंतिम चारमध्ये पोहोचेल. न्यूझीलंड आधीच उपांत्य फेरीसाठी पात्र ठरला आहे.
पाहा दोन्ही संघांचे प्लेइंग-11
श्रीलंका : पाथुम निसांका, कुसल मेंडिस (यष्टीरक्षक), धनंजय डी सिल्वा, चारिथ अस्लांका, भानुका राजपक्षे, दासुन शांका (कर्णधार), वनिंदू हसरंगा, चमिका करुणारतना, महेश थिक्शाना, लाहिरू कुमारा, कसून राजिथा
इंग्लंड : जॉस बटलर (कर्णधार), अॅलेक्स हेल्स, डेव्हिड मलान, बेन स्टोक्स, हॅरी ब्रूक, मोईन अली, लियाम लिव्हिंगस्टोन, सॅम करण, ख्रिस वोक्स, मार्क वुड, आदिल रशीद
आता या स्पर्धेतील दोन्ही संघांची कामगिरी पाहा
श्रीलंकेने 4 पैकी 2 सामने जिंकले आहेत आणि 2 गमावले आहेत. संघ जिंकला तरी त्यांच्याकडे केवळ 6 गुण असतील जे उपांत्य फेरीत प्रवेश करण्यासाठी पुरेसे नाहीत.
त्याचबरोबर इंग्लंडने आयर्लंडविरुद्ध 1 सामना गमावला आहे. जर संघाने सामना जिंकला तर त्यांचे देखील 7 गुण होतील, परंतू उच्च नेट रनरेटमुळे, ऑस्ट्रेलियाऐवजी इंग्लंड दुसऱ्या क्रमांकावर येईल.