महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । १० नोव्हेंबर । भारतीय संघासाठी आणि क्रिकेट चाहत्यांसाठी आजचा दिवस अत्यंत वेदनादायी ठरला. आज भारताला इंग्लंडविरोधातील टी-२० विश्वचषकाच्या (T20 World Cup 2022) सेमीफायनलमध्ये मोठा पराभव स्विकारावा लागला. इंग्लंडने भारताचा १० गडी राखून पराभव केला. त्यामुळे आता भारताचं वर्ल्ड कप जिंकण्याचं स्वप्न पुन्हा एकदा अपुरं राहिलं आहे. सामना हरल्यानंतर भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्माच्या डोळ्यात अश्रू साठून आले, तो रडताना दिसला. हा क्षण प्रत्येक भारतीयासाठी अत्यंत भावूक होता.
#RohitSharma #INDvsENG #SemiFinalT20WC pic.twitter.com/SqQSJSA60Y
— Muhammad Aakib (@__Aakib__) November 10, 2022
सामना संपल्यानंतर
रोहित शर्मा हा खाली मान घालूनच मैदानातून बाहेर पडला. त्यानंतर डगआऊटमध्ये बसल्यावर त्याला रडू कोसळलं. भारताचं विश्वचषक जिंकण्याचं स्वप्न हातातून निसटल्याने रोहित शर्मा भावूक झाला आणि त्याच्या डोळ्यातून अश्रूंच्या धारा वाहू लागल्या. तो डोळे पुसताना दिसला. याचा एक व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे. यावेळी रोहित शर्मा एकटा बसला होता आणि आपल्या भावनांना अश्रूंद्वारे वाट मोकळी करुन देताना दिसला.
पुन्हा एकदा रोहित शर्माच्या नशिबी निराशाच आली. २०१९ च्या टी-२० विश्वचषकाच्या सेमीफायनलमध्ये भारताला न्यूझीलंडकडून पराभव स्विकारावा लागता होता. तेव्हाही रोहित शर्माला अश्रू अनावर झाले होते.
या विश्वचषकात रोहित शर्माची कामगिरी खूपच खराब होती आणि त्याने ६ सामन्यात १९.३३ च्या सरासरीने एकूण ११६ धावा केल्या. याशिवाय, आता त्याच्या टी-२० कारकिर्दीवरही प्रश्न उपस्थित केले जात आहेत.