शोएबनं साधला मौका, सानियाला दिला धोका

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । १० नोव्हेंबर । भारताची लोकप्रिय टेनिसस्टार सानिया मिर्झा (Sania Mirza) आणि पाकिस्तानी क्रिकेटपटू शोएब मलिक (Shoaib Malik). क्रीडा जगतातलं हिट आणि हॉट कपल. पण हे कपल लवकरच वेगळं होणार असल्याची चर्चा रंगली आहे. गेल्या काही दिवसांपासून या दोघांच्या नात्यात दुरावा आल्याचं समजतंय. मात्र आता त्यावर शिक्कामोर्तब झालंय. सानिया आणि शोएबचा लवकरच तलाक (Sania Mirza-Shoaib Malik divorce) होणार असल्याची माहिती शोएबच्या अगदी जवळच्या मित्रानं दिलीय. सध्या दोघंही वेगवेगळे राहतायत. सानिया मिर्झा मुलासोबत दुबईत राहतेय, तर शोएब पाकिस्तानात. आता केवळ तलाकची औपचारिकता बाकी असल्याचं या मित्रानं स्पष्ट केलंय.

सानिया मिर्झानं आपला मुलगा इजहान (Izhaan) याच्यासोबतचा एक व्हिडिओ काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर (Social Media) पोस्ट केला. ते क्षण जे मला सर्वात अवघड प्रसंगातून बाहेर घेऊन येतात. अशा आशयाचं कॅप्शन तिनं लिहिलं होतं. त्या पोस्टनंतरच सानिया आणि शोएबच्या तलाकची चर्चा सुरू झाली.

12 एप्रिल 2010 रोजी हैदराबादमध्ये दोघांचा निकाह पार पडला. लग्नाच्या दहा वर्षानंतर त्यांच्या मुलाचा, इजहानचा जन्म झाला. मात्र अलिकडेच या दोघांमध्ये तिसरी आली आणि या नात्यात मिठाचा खडा पडला. शोएब एका दुसऱ्या ललनेच्या प्रेमात पडला असून, त्यानं सानियाला धोका दिल्याची चर्चा आता सुरू झालीय. हे केवळ सानिया आणि शोएबच्याच बाबतीत घडतंय, अशातला भाग नाही. तर याआधीही अनेक भारतीय आणि पाकिस्तान सेलिब्रेटींचा निकाह आणि मग तलाक असा प्रवास झाल्याची उदाहरणं आहेत.

भारत-पाकिस्तान आणि ‘तलाक’
बॉलिवूडची ख्यातनाम अभिनेत्री रीना रॉय आणि पाकिस्तानी क्रिकेटपटू मोहसिन खान यांचा 1983 मध्ये निकाह झाला. रीना रॉय फिल्मी करिअर सोडून कराचीला राहायला गेली. पण नंतर दोघांमध्ये वाद वाढले आणि घटस्फोट झाला. बॉलिवूड अभिनेते नसीरुद्दीन शाह यांची पहिली बायको मनारा सीकरी पाकिस्तानी होती. दोघांचा तलाक झाल्यानंतर त्यांनी अभिनेत्री रत्ना पाठकशी दुसरं लग्न केलं. जावेद जाफरीनं पाकिस्तानी अभिनेत्री झेबा बख्तियारशी लग्न केलं. मात्र वर्षभरातच दोघांचा तलाक झाला

आता याच यादीत सानिया मिर्झा आणि शोएब मलिकची भर पडलीय. त्यांच्या प्रेमकहाणीचा दि एन्ड कसा आणि कधी होतो, याकडं आता सगळ्यांचं लक्ष लागलंय.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *