महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । १३ नोव्हेंबर । पाकिस्तान आणि इंग्लंड यांच्यात आज होणाऱ्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या फायनलसाठी सारे सज्ज झाले आहेत. दोन्ही संघ मेलबर्न क्रिकेट ग्राऊंडवर पोहोचले आहेत. पण, आजचा हा सामना पावसामुळे उद्या खेळवला जाण्याची शक्यता अधिक बळावली आहे. मेलबर्नच्या हवामान खात्याच्या अंदाजानुसार आज ८०-९० टक्के पावसाची शक्यता वर्तवली जात आहे. स्थानिक वेळेनुसार सायंकाळी ५.३० वाजता पावसाला सुरुवात होण्याचा अंदाज आहे आणि अशात पाकिस्तान-इंग्लंड सामना राखीव दिवशी खेळवला जाऊ शकतो.
”ढग दाटून आले आहेत आणि १०० टक्के पावसाची शक्यता आहे. वादळी वाराही सुटला असल्याने मुसळधार पाऊस अपेक्षित आहे. ताशी १५ ते २५ किमी वेगाने हवा सुटली आहे आणि सायंकाळी हा वेग अधिक वाढण्याचा अंदाज आहे,”असे ऑस्ट्रेलियाच्या हवामान खात्याकडून सांगण्यात आले आहे. फायनलसाठी सोमवारचा दिवस राखीव म्हणून ठेवला गेला आहे, परंतु सोमवारीही ९५ टक्के पावसाची शक्यता आहे.
दोन्ही दिवस पावसाने वाया गेल्यास काय?
किमान १० षटकांचा सामना होणे गरजेचे आहे, परंतु हवामानाच्या अंदाजानुसार तेवढी षटकं होणे अवघड आहे.
आयसीसीकडून कोणत्याही परिस्थिती हा सामना खेळवण्यासाठी पूर्ण प्रयत्न केले जातील.
आज किमान षटकं झाली नाहीत, तर सामना राखीव दिशी होईल आणि तेव्हाही पावसाचा व्यत्यत आल्यास दोन्ही संघांना संयुक्त जेतेपद दिले जाईल.