Maharashtra Politics: “बाळासाहेबांच्या विचारांना मुठमाती दिली, उद्धव ठाकरेंसोबत भविष्यात ………. ”

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । १३ नोव्हेंबर । शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीबरोबर जाणे म्हणजे बाळासाहेबांच्या विचारांना मूठमाती देण्याचा प्रकार होता. उद्धव ठाकरे ज्या पद्धतीने काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा विचार घेऊन पक्ष चालवत आहेत. त्यावरून आगामी काळात उद्धव ठाकरे यांच्या व्यासपीठावर चार लोकांशिवाय कोणी दिसणार नाही. ही स्थिती येणार आहे, अशी घणाघाती टीका भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी केली. प्रसारमाध्यमांशी बोलताना बावनकुळे यांनी शिवसेना ठाकरे गट आणि उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला.

महाराष्ट्रातून अनेक प्रकल्प राज्याबाहेर जात असल्यावरून केल्या जात असलेल्या टीकेच बावनकुळे यांनी खरपूस शब्दांत समाचार घेतला. उद्धव ठाकरे अडीच वर्ष मुख्यमंत्री होते. पण त्यांचा सर्व काळ काँग्रेस आणि शरद पवार यांना सांभाळण्यात गेला. त्यांना उद्योजकांशी काही घेणेदेणे नव्हते. उद्धव ठाकरे बोलत नव्हते म्हणून त्यांना आमदार सोडून गेले. जर त्यांना आमदार सोडून जाऊन शकतात तर त्यांच्या काळात उद्योजक का सोडून जाऊ शकत नाहीत, अशी विचारणा बावनकुळे यांनी केली आहे.

महाविकास आघाडीच्या अडीच वर्षांच्या काळातील चुकांमुळे औद्योगिक प्रकल्प महाराष्ट्राबाहेर गेले. राज्यात कोणताही उद्योग आणायचा असेल गुंतवणूक होऊ द्यायची असेल तर उद्योजकांशी बोलावे लागते. बैठका घ्याव्या लागतात. पण त्यासाठी मुख्यमंत्री उपलब्ध हवेत ना? उद्धव ठाकरे १८ महिने मंत्रालयात फिरकलेच नाहीत. सचिवांनाही मुख्यमंत्र्यांची भेट मिळण्यासाठी वाट पाहावी लागायची. तिथे उद्योग कसे येणार, अशी विचारणा बावनकुळे यांनी केली.

सुषमा अंधारे यांचे विभक्त पती वैजनाथ वाघमारे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या उपस्थिती बाळासाहेबांची शिवसेना या पक्षात प्रवेश केला. या राजकीय खेळीने सुषमा अंधारेंना फटका बसल्याचं मानले जात आहे. सुषमा अंधारे या मुलुखमैदानी तोफ नसून त्यांना मीच घडवले असल्याचे वैजनाथ वाघमारेंनी स्पष्टपणे सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *