दीपाली सय्यद यांच्या शिंदे गटातील प्रवेशात तिसऱ्यांदा खोडा

Spread the love

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । १४ नोव्हेंबर । शिंदे गटात प्रवेशाच्या तीन तारखा जाहीर हाेऊनही दीपाली सय्यद यांना अजूनही पक्ष प्रवेश मिळाला नाही. त्या अजूनही वेटिंगवरच आहेत. दीपाली यांनी ९ नोव्हेंबर रोजी रश्मी उद्धव ठाकरेंसह खासदार संजय राऊत यांच्यावर टीकेची झोड उठवत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटात आजच सामील होणार असल्याची घोषणा केली होती.

मात्र, शिंदे त्यांना भेटलेच नाहीत. त्यानंतर एक-दाेन दिवसांत शिंदे गटात प्रवेश हाेईल, असे त्यांनी सांगितले. ते दोन दिवसही असेच गेले. रविवारी आनंद आश्रम येथे प्रवेश होणार असल्याचे त्यांनी जाहीर केले होते. मात्र, अचानक प्रवेश होणार नाही, असे त्यांनी कळवले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *