कार्तिकी वारीमुळे आळंदीत वाहनांना उद्यापासून बंदी

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । १६ नोव्हेंबर । संत ज्ञानेश्वर महाराजांच्या ७२६व्या संजीवन समाधी सोहळ्यानिमित्त आळंदीतील कार्तिकी वारीसाठी वारकऱ्यांची आणि अत्यावश्यक सेवा पुरवणारी वाहने वगळता अन्य वाहनांना गुरुवार (ता. १७) ते बुधवार (ता. २३) या कालावधीत आळंदी आणि परिसरात प्रवेशबंदी केली आहे. वाहनचालकांनी पर्यायी मार्गाचा वापर करण्याचे आवाहन आळंदी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक सुनील गोडसे यांनी केले आहे.

मोशी-देहू फाटा रस्ता बंद असणार आहे. डुडुळगाव जकात नाका हवालदार वस्ती येथे नाकाबंदी केली जाणार असून, मोशी ते चाकण ते शिक्रापूर हा मार्ग तसेच मोशी भोसरी ते मॅगझीन चौक, दिघी या पर्यायी मार्गाचा वापर करावा.

चाकणकडून (आळंदी फाटा) येणारी वाहने आळंदी रस्त्यावर इंद्रायणी हॉस्पिटलजवळील आळंदी फाटा हनुमानवाडी येथे नाकाबंदी करण्यात येणार आहे.

मॅगझीन चौक येथे नाकाबंदी करण्यात येणार असून, वाहनचालकांनी पुण्याहून येणारी वाहने दिघी मॅगझीन चौक-भोसरी-मोशी-चाकण मार्गाचा वापर करावा.

मरकळ रस्त्यावरील वाहनांनी बाह्यवळण मार्गाचा वापर करावा. धानोरे फाटा येथे रस्ता बंद करण्यात येणार आहे. पर्यायी मार्ग मरकळ-सोळू-धानोरे-चऱ्होली खुर्द बाह्यवळण मार्गाने चऱ्होली बुद्रुक मार्गे वाहने पुणे येथे जातील. मरकळ औद्योगिक वाहतूक कोयाळी वडगाव घेनंद शेलगाव फाटा चाकण या मार्गाचा वापर करावा.

अवजड वाहनांना हेही रस्ते बंद

मोशीतील गावठाण चौक आणि भारतमाता चौक येथून येण्यास बंदी

नाशिक महामार्गावरील चिंबळी फाटा चौकातून चिंबळी गावठाण मार्गे रस्ता बंद

देहूरोड येथील देहू कमानीतून देहूगावाकडे जाण्यास बंदी

तळेगाव चाकण रस्त्यावरील देहू फाटा येथून देहूगावाकडे जाण्यास बंदी

निघोजे-महाळुंगे येथून महिंद्रा सर्कलकडून तळवडे आयटी पार्ककडे जाणारा रस्ता

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *