महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । १६ नोव्हेंबर । शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा उद्या स्मृतीदिन आहे. त्यामुळे राज्यातील कानाकोपऱ्यातून असंख्य कार्यकर्ते दादरच्या शिवाजी पार्कवरील बाळासाहेबांच्या स्मृती स्थळावर येण्याची शक्यता आहे. यावेळी दरवर्षी प्रमाणे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेही कुटुंबासह स्मृती स्थळावर असणार आहेत. अनेक आमदारही उद्या बाळासाहेबांना अभिवादन करण्यासाठी शिवाजी पार्कावर येतील. उद्धव ठाकरे उद्या स्मृतीस्थळावर असणार आहेत. त्यामुळे समोरासमोरची भेट आणि कार्यकर्त्यांमधील वाद टाळण्यासाठी एकनाथ शिंदे हा आजच स्मृती स्थळावर जाणार आहेत.
शिंदे गटातील आमदार आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज बाळासाहेबांच्या स्मृतिस्थळाला अभिवादन करणार आहेत. उद्या 17 तारखेला बाळासाहेबांच्या स्मृतिदिनाच्या दिवशी होऊ शकणारा वाद टाळण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आजच बाळासाहेबांच्या स्मृती स्थळाला अभिवादन करणार आहेत.
17 नोव्हेंबरला होणाऱ्या बाळासाहेब ठाकरेंच्या स्मृतिदिनानिमित्त आज शिंदे गटाकडून ‘वारसा विचारांचा’ परिसंवादाचं आयोजन करण्यात आलं आहे. दादरच्या सावरकर स्मारकात या परिसंवादाचं आयोजन करण्यात आलं आहे. या परिसंवादाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस संवाद साधणार आहेत.