कोरोनाग्रस्तांचा आकडा हा चिंताजनक ; तिसऱ्या स्टेजकडे जातोय का? केंद्रीय गृहमंत्री डॉ. हर्षवर्धन

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४- ऑनलाईन – मुंबई – विशेष प्रतिनिधी -डॉ. हर्षवर्धन म्हणाले की, आतापर्यंत कोरोना विषाणूच्या संक्रमणावर नियंत्रण मिळवण्यात आपल्याला यश मिळाले आहे. उपलब्ध साधन सामग्री आणि आवश्यक उपाय योजना राबवून पुढेही संक्रमणाचा वेग कमी करण्यात आपण यशस्वी ठरु, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. सध्याच्या घडीला आपण कोरोनाच्या दुसऱ्या टप्प्यात आहोत. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव हा तिसऱ्या टप्प्यात जाऊ नये, यासाठी प्रयत्नशील असून ही वेळ आपल्यावर येणार नाही, असेही ते म्हणाले. यासाठी योग्य तयारी करण्यात आल्याची माहितीही त्यांनी दिली.

देशव्यापी लॉकडाऊनच्या दरम्यान विविध भागात अडकलेल्या मजूरांचे स्थलांतर होत असताना कोरोना विषाणूचा प्रादुर्भात तिसऱ्या टप्प्यात जाण्याचा धोका वाढला आहे. मागील पाच दिवसांत कोरोनाग्रस्तांचा आकडा हा चिंताजनकरित्या वाढत असून तिसऱ्या टप्प्याच्या धोक्याची चाहूल डोकेवर काढण्याची भिती निर्माण होताना दिसते. यासंदर्भात केंद्रीय गृहमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी स्पष्टीकरण दिले आहे. यासंदर्भात केंद्रीय आरोग्य मंत्र्यांनी वृतसंस्थेशी संवाद साधताना कोरोनाविरोधात ताकदीने लढण्यासाठी भारत सज्ज आहे, असे सांगितले.

कोरोना विषाणूचा देशातील वाढता आकडा नियंत्रणात आणण्यासाठी 24 मार्चपासून देशात लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली होती. परिस्थिती आवाक्यात येत नसल्याने लॉकडाऊनचा कालावधी 17 मे पर्यंत वाढवण्यात आलाय. दरम्यान काही भागात ठराविक गोष्टींना मूभा देत आर्थिक चक्र पूर्ववत करण्याचे प्रयत्न देखील सुरु आहेत. 22 मार्च रोजी जनता कर्फ्यूला मिळालेल्या प्रतिसादानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोणतीही कल्पना न देता देशव्यापी लॉकडाऊनची घोषणा केल्यानंतर अनेक मजूर वेगवेगळ्या राज्यात अडकले होते.

तिसऱ्या टप्प्यातील लॉकडाऊनमध्ये मजूरांना घरी जाण्याची परवानगी देण्यात आली आहे. मजूरांच्या स्थलांतरानंतर देशातील कोरोनाग्रस्तांच्या आकड्यात वाढ झाल्याचे दिसले. मागील पाच दिवसांत देशात 14 हजार नवे रुग्ण आढळले असून यातील जवळपास 500 लोकांनी कोरोनामुळे जीव गमावला आहे. देशातील कोरोनाग्रस्तांचा वाढता आकडा हा कोरोना संक्रमणाचा प्रादुर्भाव हा तिसऱ्या टप्प्याच्या दिशेने होत असल्याची भिती निर्माण होत आहे. पण केंद्रीय आरोग्य मंत्र्यांनी आपण योग्य ती खबरदारी घेत असून संकट वाढणार नाही, याची काळजी घेत असल्याचा विश्वास देशवासियांना दिला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *