माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी कोणत्या गटात? वाढदिवशी ‘सरां’नी भूमिका केली स्पष्ट

Spread the love

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि . २ डिसेंबर । मी पहिल्यापासून आतापर्यंत शिवसेनेत आहे, मी उद्धव ठाकरे यांच्यासोबत सातत्याने उभा आहे, असं माजी मुख्यमंत्री आणि ज्येष्ठ नेते मनोहर जोशी यांनी स्पष्ट केलं. वाढदिवसाच्या निमित्ताने कार्यकर्त्यांनी मनोहर जोशी सरांची भेट घेतली. यावेळी संवाद साधताना त्यांनी ठाकरे गटात असल्याचं स्पष्ट केलं.

मनोहर जोशी काय म्हणाले?

माझं रक्त शिवसेनेचं आहे. आधी शिवसेनाप्रमुख हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा सहवास, नंतर उद्धवजींचा सहवास, मी महाराष्ट्र, शिवसेनेसाठी आहे. शिवसेना ही संघटना महाराष्ट्रावर अतोनात प्रेम करते. बाळासाहेबांच्या अपेक्षा मी पूर्ण करु शकलो याचं समाधान असल्याचं मनोहर जोशी ‘टीव्ही9 मराठी’शी बोलताना म्हणाले.

मी उद्धव ठाकरेंसोबत सातत्याने उभा आहे. मी पहिल्यापासून आतापर्यंत शिवसेनेतच आहे, असं मनोहर जोशी यांनी स्पष्ट केलं. त्यामुळे एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील ‘बाळासाहेबांची शिवसेना’ पक्षात जोशी जाणार असल्याच्या चर्चांना फुलस्टॉप मिळाला आहे. जोशी हे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) या पक्षात असल्याचं स्पष्ट झालं.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *