महाराष्ट्रात आढळल्या दोन सोन्याच्या खाणी, मुख्यमंत्र्यांनी दिली महत्त्वाची माहिती

Spread the love

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि . २ डिसेंबर । महाराष्ट्रातील चंद्रपूर जिल्ह्यात सोन्याच्या खाणी सापडल्याची माहिती समोर येत आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील मिंझरी आणि बामणी या भागात सोन्याच्या दोन खाणी आढळून आल्या आहेत. याबाबत राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही प्रतिक्रिया दिला आहे. (Cm Eknath Shinde)

चंद्रपूर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात कोळशाच्या खाणी आहेत. त्यानंतर आता भूगर्भात तांबे आणि सोन्याच्या खाणीही आहेत. केंद्र सरकारच्या खनिकर्म विभागाचा अहवाल असल्याची माहिती राज्याच्या खनिकर्म विभागाकडून देण्यात आली आहे. त्यादृष्टीने खनिकर्म विभागाने चाचणी सुरू केली आहे. लोकमत या वृत्तपत्राने याबाबत माहिती दिली आहे.

राज्यात सोन्याच्या खाणी असल्याचे संकेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एका कार्यक्रमात दिले होते. राज्यात खनिकर्म संशोधन संस्था सुरू करुन या व्यवसायातील अडचणी दूर करुन राज्याच्या महसूलात वाढ झाली पाहिजे, असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं होतं. त्यानंतर आता मुख्यमंत्र्यांनी याबाबत स्पष्ट केलं आहे.
राज्यात सोन्याचे दोन ब्लॉक असल्याची माहिती केंद्रीय अधिकाऱ्यांनी दिली आहे. आमच्या सरकारच्या काळात हे सोने निघाले तर ती राज्यासाठी खूप मोठी उपलब्धी असेल. राज्यात खनिकर्म क्षेत्राला मोठा वाव असून गडचिरोलीसारख्या दुर्गम भागात देशातील सर्वात मोठा स्टील प्रकल्प सुरू करु शकतो, असा विश्वास यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला आहे.

दरम्यान, चंद्रपूर येथील गोंडपिपरी तालुक्याच्या भूगर्भात मौल्यवान प्लॅटिनम, सोने आणि दुर्मिळात दुर्मिळ म्हणून ओळखले जाणारे रूथेनियम, रेडिअम, इरेडिअम धातू असल्याचं दहा वर्षांपूर्वी झालेल्या एका संशोधनातून समोर आलं आहे. भारतीय भूगर्भ सर्वेक्षण विभागाच्या शास्त्रज्ञांनी तालुक्यात २००७ ते २०१०मध्ये करण्यात आलेल्या सर्व्हेत हे उघड झालं होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *