वर्ल्ड चॅम्पियन जर्मनी स्पर्धेबाहेर, फिफा विश्वचषकात मोठा उलटफेर

Spread the love

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि . २ डिसेंबर । फिफा विश्वचषक २०२२ मध्ये सर्वात मोठा अपसेट पाहायला मिळाला. सामना जिंकूनही विश्वविजेत्या संघाला विश्वचषक स्पर्धेतून बाहेर पडावे लागले आहे. विश्वविजेता जर्मनीचे फिफा विश्वचषकातील आव्हान संपुष्टात आले आहे. २०१४ मध्ये चॅम्पियन बनल्यानंतर सलग दुसऱ्या विश्वचषकात हा संघ बाद फेरीपर्यंत पोहोचू शकला नाही. त्यांच्या शेवटच्या गट सामन्यात जपान विरुद्ध स्पेन आणि कोस्टा रिका विरुद्ध जर्मनीने ई गटातील शेवटच्या दोन सामन्यात एकमेकांशी लढले. स्पेनचा जपानविरुद्ध २-१ असा पराभव झाला आणि जर्मनीने कोस्टा रिकाचा ४-२ असा पराभव केला. स्पेन आणि जर्मनी या दोघांना ४-४ गुण मिळाले पण त्यानंतरही जर्मनीचा संघ बाहेर पडला.

जर्मनीकडून ग्रॅब्री (१०व्या मिनिटाला), काई हॅव्हर्ट्झ (७३व्या आणि ८५व्या), फुलक्रग (८९व्या) यांनी गोल केले. त्याचवेळी कोस्टा रिकासाठी तेजेडा (५८व्या) आणि जुआन (७०व्या) यांनी गोल केले. स्पेनसाठी अल्वेरा मोराटाने गोल करत संघाला आघाडी मिळवून दिली. पण रित्सूने ४८व्या मिनिटाला आणि त्यानंतर ५१व्या मिनिटाला तनाकाने गोल करत संघाला विजय मिळवून दिला.

जिंकूनही जर्मनी बाहेर कसा पडला

जपानने तीनपैकी दोन सामने जिंकून गटात ६ गुणांसह अव्वल स्थान पटकावले आहे. स्पेन आणि जर्मनीचे ४-४ गुण होते. समान गुणांच्या बाबतीत, गोलमधील फरक ठरवतो कि कोणता संघ पुढील फेरीत जाईल. स्पेनने ३ सामन्यांत ९ गोल केले आणि ५ गमवले. तर जर्मनीने ६ गोल केले आणि ५ गमावले. स्पेनचा गोल फरक +६ होता तर जर्मनीचा +१ होता. याच कारणामुळे स्पेनला बाद फेरीत स्थान मिळाले आणि जर्मनीचा प्रवास संपला.

जर्मनी हा फिफा विश्वचषकातील सर्वात यशस्वी संघांपैकी एक आहे. त्याने आतापर्यंत झालेल्या २२ पैकी २० स्पर्धांमध्ये भाग घेतला आहे. या संघाने ब्राझीलनंतर सर्वाधिक ४ विजेतेपदे जिंकली आहेत. या विश्वचषक स्पर्धेत केवळ तिने वेळा संघाला बाद फेरी गाठता आली नाही. २०२२ आणि २०१८ पूर्वी १९३८ मध्ये संघ पहिल्या फेरीत बाहेर पडला होता. अंतिम १६ मध्ये जपानचा सामना क्रोएशियाशी तर स्पेनचा सामना मोरोक्कोशी होणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *