महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । ८ डिसेंबर । देशभराचे लक्ष लागलेल्या गुजरात आणि हिमाचल प्रदेश विधानसभा निवडणुकीची मतमोजणी होणार आहे. त्याचबरोबर उत्तर प्रदेशातील मैनपुरी लोकसभा मतदारसंघ आणि पाच राज्यांतील सहा विधानसभा जागांसाठी होणाऱ्या पोटनिवडणुकांसाठीही गुरुवारी मतमोजणी होणार आहे. त्यामुळे गुरुवार हा राजकीयदृष्ट्या ‘निकाल दिन’ ठरणार आहे. गुजरातमध्ये २७ वर्षांपासून भाजपची सत्ता असून यंदा भाजप जिंकणार की आप अन् काँग्रेसचा करिश्मा पाहायला मिळणार याकडे देशाचे लक्ष लागले आहे.
पंतप्रधान मोदींनी स्वत: विशेष लक्ष दिल्याने मोदींचीही प्रतिष्ठा गुजरातमध्ये पणाला लागली आहे. सकाळी ८ वाजल्यापासून येथील निकालाला सुरुवात झाली आहे. दरम्यान, एक्झिट पोलमध्ये गुजरातच यंदा बाजी मारणार असा अंदाज दिसून येत आहे.