महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । १५ डिसेंबर । छत्रपती शिवाजी महाराजांचं जन्मस्थळ चुकवल्यानं विरोधकांनी प्रसाद लाड यांच्याविरोधात रान उठवलं होतं. पण आता खुद्द संजय राऊत यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं जन्मस्थळ चुकवलंय. बाबासाहेबांचा जन्म महाराष्ट्रात झाल्याचं वक्तव्य संजय राऊत यांनी केलंय. बाबासाहेबांचा जन्म मध्य प्रदेशातील महू या ठिकाणी झाला होता. पण संजय राऊत यांनी बोलण्याच्या ओघात बाबासाहेबांचा जन्म महाराष्ट्रात झाल्याचं सांगितलंय. सर्वज्ञानी राऊतांचं अगाध ज्ञान अशा शब्दात भाजप महिला मोर्चाच्या अध्यक्षा चित्रा वाघ यांनी राऊतांवर निशाणा साधलाय.
चित्रा वाघ यांनी संजय राऊत यांच्या विधानाचा व्हिडिओ ट्वीट केला आहे. ‘लो कर लो बात… सर्वज्ञानी संजय राऊतजी म्हणताहेत
बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म महाराष्ट्रात झाला… अहो…महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म मध्यप्रदेशातील महू येथे झाला आहे, तर हे असं आहे सर्वज्ञानी यांचं अगाध ज्ञान,’ असं ट्वीट चित्रा वाघ यांनी केलं आहे.
लो कर लो बात…
सर्वज्ञानी @rautsanjay61 जी म्हणताहेत
बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म महाराष्ट्रात झाला …अहो…महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म मध्यप्रदेशातील महू येथे झाला आहे
तर हे असं आहे सर्वज्ञानी यांचं अगाध ज्ञान@BJP4Maharashtra @BJP4Mumbai pic.twitter.com/tTjb5GFjyW
— Chitra Kishor Wagh (@ChitraKWagh) December 15, 2022