Election: ठरलं? लोकसभेसोबत राज्यातील विधानसभा निवडणुकीबाबत मोठं वक्तव्य

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि . २७ डिसेंबर । हिवाळी अधिवेशनामध्ये सत्ताधारी विरोधक यांच्यामध्ये चांगलीच जुंपली असल्याचं दिसून येत आहे. सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करत आहेत. भ्रष्टाचार, कर्नाटक-महाराष्ट्र सीमावाद राज्यातील राजकीय वातावरण तापले असतानाच भाजपचे नेते आणि केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीबाबत मोठं वक्तव्य केलं आहे.

राज्यातील सध्याची राजकीय परिस्थिती पाहता लोकसभा निवडणुकीबरोबरच विधानसभेच्या देखील निवडणुका होणार असल्याचं दानवे यांनी म्हंटलं आहे. औरंगाबादच्या फुलंब्री तालुक्यामध्ये नवनिर्वाचित भाजप सरपंच आणि ग्रामपंचायत सदस्यांच्या सत्कार सोहळ्यावेळी कार्यक्रमात बोलताना दानवे यांनी हे वक्तव्य केलं आहे.

दरम्यान रावसाहेब दानवे बोलताना म्हणाले की, राज्यातील आताची राजकीय परिस्थिती पाहता लोकसभेबरोबर विधानसभेच्या निवडणुका होऊ शकतात. त्याचबरोबर औरंगाबाद जिल्ह्यातील इतर पक्षातील नेते भाजपमध्ये प्रवेश करतील, असा दावा दानवे यांनी यावेळी केलाय. रावसाहेब दानवे यांच्या या विधानामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. गेल्या काही दिवसांपासून मध्यावधी निवडणूक लागण्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात सुरू असतानाच दानवे यांनी हे वक्तव्य केलं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *