Rishabh Pant Accident : रिषभ पंतच्या कारचा भीषण अपघात; डोक्याला आणि पायाला गंभीर दुखापत

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । ३० डिसेंबर । भारतीय क्रिकेट संघाचा खेळाडू रिषभ पंतच्या कारला दिल्लीहून घरी परतत असताना अपघात झाला. हम्मादपूर झालजवळ रुरकीच्या नरसन बॉर्डरनजीक त्याच्या कारला अपघात झाला. यानंतर रिषभला डेहराडूनच्या मॅक्स हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी आणण्यात आले आहे. तिथे त्याची प्लास्टिक सर्जरी केली जाणार आहे. खानपूरचे आमदार उमेश कुमार यांनीदेखील त्याच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी रुग्णालयात भेट दिली.

डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, रिषभ पंतच्या डोक्याला आणि पायाला दुखापत झाली आहे. माहिती मिळताच देहात पोलीस अधीक्षक स्वप्ना किशोर सिंह घटनास्थळी पोहोचल्या. सध्या रिषभ पंतची प्रकृती स्थिर आहे. त्याला रुरकीहून डेहराडूनच्या मॅक्स हॉस्पिटलमध्ये पाठवण्यात आले आहे. तिथे त्याची प्लास्टिक सर्जरी केली जाणार असल्याची माहिती सक्षम हॉस्पिटलचे अध्यक्ष
डॉ. सुशील नागर यांनी दिली.

रेलिंगवर आदळली कार
प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, रिषभची कार रेलिंगला धडकली, त्यानंतर कारने पेट घेतला. मोठ्या परिश्रमानंतर कार लागलेली आग आटोक्यात आणण्यात आली. त्याचवेळी अपघातात गंभीर जखमी झालेल्या रिषभ पंतला दिल्ली रोडवरील सक्षम रुग्णालयात दाखल करण्यात आले.

दिल्लीहून रुरकीला येताना अपघात
शुक्रवारी सकाळी भारतीय क्रिकेटपटू रिषभ पंत दिल्लीहून रुरकीच्या दिशेने कारमधून येत होता त्यावेळी हा अपघात घडला. रिषभ पंतचं घर रुरकीमध्येच आहे. त्यांची कार नरसन शहराजवळ असताना गाडीवरील नियंत्रण सुटलं आणि रेलिंग, खांब तोडून कार उलटली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *