![]()
महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । १ जानेवारी २०२३ । पिंपरी-चिंचवड महानगरपालिका प्रशासनाने सुशोभीकरणाच्या नावाखाली नगडी येथील लोकमान्य टिळकांचा पुतळा पाडून पूर्णाकृती पुतळा बसविण्याचे काम सुरू आहे. मात्र पूव्रीच्या अर्धाकृती पुतळ्याला असलेली मेघडंबरी काढून टाकण्यात आली आहे. पिंपरी चिंचवड महानगरपालिका प्रशासनाने व्यापारी वर्गाला फायदा होण्यासाठी ही शक्कल लढवली असून पूर्णाकृती पुतळा उभारण्याचे काम अत्यंत संथ गतीने सुरू आहे. या कामाला गती मिळावी व पुतळ्याचे काम लवकरात लवकर पूर्ण करावे, या मागणीचे निवेदन सामाजिक कार्यकर्ते सचिन काळभोर यांनी महापालिका आयुक्त शेखर सिंह यांना इमेलद्वारे दिले आहे.
निगडी येथील लोकमान्य टिळक पुतळा काम संथ गतीने सुरू असून पुर्वी पेक्षा या पुतळ्याचा चौथरा कमी करण्यात आला असून व्यापारी गाळे धारकांना फायदा होण्यासाठी लोकमान्य टिळक पुतळा चौथरा आकाराने पिंपरी-चिंचवड महानगरपालिका प्रशासनाने जाणिवपूर्वक कमी केली असून, पुर्वी लोकमान्य टिळक पुतळा खूप मोठ्या प्रमाणावर मेघडंबरीसह डौलदार पद्धतीने मोठ्या आकाराचे बांधकाम होते.
सदर बांधकाम सुरू होण्यापूर्वी पिंपरी-चिंचवड महानगरपालिका आयुक्तांना या संदर्भात तक्रार दाखल केली होती. मात्र तरीही लोकमान्य टिळक पुतळा चौथरा आकार कमी करुन त्या ठिकाणी लोकमान्य टिळक पूर्णाकृती पुतळा बांधकाम संथ गतीने सुरू आहे. पूर्वीचा अर्धाकृती पुतळा हलविण्यात आला. बेकायदेशीर पद्धतीने लोकमान्य टिळक अर्धाकृती पुतळा हलवून पिंपरी-चिंचवड महानगरपालिका प्रशासनाच्यावतीने पूर्णाकृती पुतळ्याचे सुशोभीकरण करण्यात येत आहे. लोकमान्य टिळक पुतळा चौथरा व मेघडंबरीचा आकार कमी करण्यात आला आहे. ही बाब अत्यंत गंभीर असून त्या संदर्भात पिंपरी चिंचवड महानगरपालिका प्रशासनाच्या कार्यपद्धतीविरोधात आवाज उठविला जात आहे.
दिला इशारा जाता जाता…
लोकमान्य टिळक पुतळा चौथरा व मेघडंबरी आकार क्षेत्र कमी केल्यास किंवा लोकमान्य टिळक पुतळा आजूबाजूला पिंपरी-चिंचवड महानगरपालिका प्रशासनाने स्वतंत्र जागा कंपाऊंड वॉल करून ताबा घेण्यात यावा. अन्यथा रास्ता रोको आंदोलन करुन पिंपरी-चिंचवड महानगरपालिका प्रशासनाचा जाहीर निषेध व्यक्त करण्यात येईल, असा निर्वाणीचा इशारा सामाजिक कार्यकर्ते सचिन काळभोर यांनी निवेदनाद्वारे देण्यात आला आहे.