जैन तीर्थक्षेत्र वाचविण्यासाठी मुनी सुज्ञेयसागर महाराजांचा प्राणत्याग

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । ४ जानेवारी । झारखंडमधील जैन तीर्थक्षेत्र सम्मेद शिखरजीला पर्यटनस्थळ घोषित केल्यानंतर त्याचा विरोध करणारे जैन मुनी सुज्ञेयसागर महाराज (७२) यांनी मंगळवारी प्राणत्याग केला. या निर्णयाविरुद्ध ते १० दिवसांपासून आमरण उपोषण करत होते. मुनी सुज्ञेयसागर महाराज सांगानेर येथे २५ डिसेंबरपासून उपोषण सुरू होते. त्यांना जयपूरच्या सांगानेरमध्ये समाधी देण्यात आली. मुनी सुज्ञेयसागर यांचा जन्म जोधपूरच्या बिलाडा येथे झाला होता. पण, त्यांचे कर्मक्षेत्र मुंबईतील अंधेरी हे होते. त्यांनी आचार्य सुनील सागर महाराज यांच्याकडून गिरनारमध्ये दीक्षा घेतली होती.

आगामी काळात आंदोलन तीव्र करणार
अखिल भारतीय जैन बँकर्स फोरमचे अध्यक्ष भागचंद्र जैन यांनी सांगितले की, मुनीश्री यांनी सम्मेद शिखरजीला वाचविण्यासाठी बलिदान दिले आहे. दरम्यान, जयपूरमधील जैन मुनी आचार्य शंशाक म्हणाले की, जैन समाज अहिंसक पद्धतीने आंदोलन करत आहे. आगामी काळात आंदोलन तीव्र केले जाईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *