महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । ८ जानेवारी । राज्य सरकार महागाई व बेरोजगारी रोखण्यात अपयशी ठरले असून केवळ महापुरुषांच्या नावाने चुकीची वक्तव्ये करत आहे. तसेच, या भोवतीच राजकारण फिरवायचे व जनतेची दिशाभूल करायचे काम सुरू असल्याची टीका आमदार सुनील शेळके यांनी केली. महागाई व बेरोजगारीच्या विरोधात राष्ट्रवादी महिला आघाडीच्या वतीने सुरू करण्यात आलेल्या जनसागर यात्रेचे वडगाव मावळ येथे स्वागत करण्यात आले, या वेळी आमदार सुनील शेळके बोलत होते.कार्यक्रमात आमदार शेळके यांसह राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष विद्या चव्हाण, प्रदेश निरीक्षक आशा मिरगे, पश्चिम महाराष्ट्र अध्यक्षा कविता म्हेत्रे, जिल्हाध्यक्षा भारती शेवाळे, माजी महापौर राजलक्ष्मी भोसले, रुपाली दाभाडे , ज्येष्ठ नेते गणेश ढोरे, विठ्ठलराव शिंदे, तालुकाध्यक्ष गणेश खांडगे, जिल्हा परिषदेचे माजी सभापती बाबुराव वायकर, नगराध्यक्ष मयूर ढोरे आदींच्या उपस्थितीत वडगाव शहरामध्ये जनसागर यात्रेचे स्वागत करून रॅली काढण्यात आली.
या वेळी उपनगराध्यक्ष राजेंद्र कुडे, गणेश काकडे, साहेबराव कारके, नारायण ठाकर, पंढरी नाथ ढोरे, चंद्रकांत दाभाडे, संजय बाविस्कर, अतुल राऊत, युवक जिल्हाध्यक्ष सचिन घोटकुले, किशोर सातकर, ग्रामीण अध्यक्ष संदीप आंद्रे, शहराध्यक्ष प्रवीण ढोरे, अतुल वायकर, महिलाध्यक्षा दीपाली गराडे, सुवर्णा राऊत, शितल हगवणे, शैलजा काळोखे, वैशाली ढोरे उपस्थित होते. अतुल राऊत यांनी सूत्रसंचालन केले तर संध्या थोरात यांनी आभार मानले.