महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । ८ जानेवारी । दिनांक ०६ ते ०८ जानेवारी रोजी २०२३रोजी होत आहे.पिंपरी-चिंचवड येथे राज्यस्तरीय मूयथाई क्रिडा स्पर्धेचा प्रारंभ झाला यात महाराष्ट्रातील जवळपास २५० ते ३५० स्पर्धकांनी सहभाग घेतला यात महाराष्ट्र राज्यातील लातूर, नागपूर, सोलापूर, कोल्हापूर, ठाणे, पूणे, तसेच पिंपरी चिंचवड मधून स्पर्धकांनी भाग घेतला आहे. या स्पर्धेत मूयथाई असोशिएशन ऑफ महाराष्ट्रचे अबू चाऊस सर यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडणार आहेत. स्पर्धेचे नियोजन पिंपरी-चिंचवडचे अध्यक्ष- नरेश मेहत्रे सर, सचिव – प्रविण मेळावणे सर, खजिनदार- पल्लवी पाटील मॅडम तसेच मूख्य प्रशिक्षिका वैष्णवी मेहेत्रे, दिपक मेहत्रे, धनश्री वारके व प्रतिक्षा सकपाळ यांनी पंच म्हणून जवाबदारी सांभाळली आहे. या स्पर्धेसाठी प्रथम, द्वितीय, तृतीय, चतुर्थ क्रमांकांचे पारितोषिक ट्राफी, मेडल्स तसेच प्रो-मॅचेस साठी टायटल बेल्ट व रोख रक्कम ठेवण्यात आली आहे.