महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । १० जानेवारी । भारतीय संघ मंगळवारी श्रीलंकेविरुद्ध या वर्षातील पहिला वनडे सामना खेळणार आहे. गुवाहाटी येथे दुपारी दीड वाजता सुरू होणाऱ्या या सामन्याकडे संघाच्या मिशन वर्ल्ड कपचा शंख म्हणूनही पाहिले जात आहे.
यावर्षी ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये एकदिवसीय विश्वचषक भारतात खेळवला जाणार आहे. त्यामुळे आतापासून ते टूर्नामेंट सुरू होईपर्यंत देशात होणारा प्रत्येक एकदिवसीय सामना भारतीय संघासाठी खूप महत्त्वाचा असणार आहे.
निवडकर्त्यांनी कर्णधार रोहित शर्मासारख्या अनुभवी विराट कोहली, केएल राहुल आणि हार्दिक पंड्यासारख्या वरिष्ठ खेळाडूंना या मालिकेत स्थान देण्याचा निर्णय घेतला आहे. याआधी वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहचेही नाव या यादीत समाविष्ट होते, मात्र आता त्याला विश्रांती देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
या महिन्यातील भारताचे एकदिवसीय वेळापत्रक पाहा
रोहित-विराटवर क्रिकेटप्रेमींचे लक्ष, बुमराह खेळणार नाही
भारतीय कर्णधार अंगठ्याच्या दुखापतीतून पुनरागमन करत असल्याने वर्षातील पहिल्या सामन्यात कर्णधार रोहित शर्मा आणि विराट कोहली यांच्यावर क्रिकेटप्रेमींचे लक्ष असेल. तर भारताचा माजी कर्णधार विराट कोहली टी-20 ब्रेकमधून येत आहे. अलीकडेच कोहलीने आयपीएलपर्यंत टी-२० मधून ब्रेक घेण्याचा निर्णय घेतला आहे. केएल राहुलचा फॉर्मही निवडकर्त्यांसाठी चिंतेचा विषय असेल. दरम्यान, जसप्रीत बुमराहचे पुनरागमन काही दिवसांसाठी पुढे ढकलण्यात आले आहे. वनडे मालिकेसाठी त्याची संघात निवड झाली.
द्विशतक झळकावणाऱ्या इशान किशनला संधी मिळणार नाही
कर्णधार रोहित शर्माने सामन्याच्या पूर्वसंध्येला सांगितले की, शुभमन गिलसोबत डावाची सुरूवात करेल. म्हणजेच बांगलादेश दौऱ्यावर वनडे क्रिकेटमध्ये द्विशतक झळकावणारा इशान किशन खेळणार नाही. रोहितने सांगितले की, इशानला बाहेर ठेवणे हा एक कठीण निर्णय आहे पण त्याला सध्या गिलला अधिक संधी द्यायची आहेत. एवढेच नाही तर या सामन्यात उत्कृष्ट फॉर्मात असलेल्या सूर्यकुमार यादव आणि श्रेयस अय्यर यापैकी एकाला बाहेर बसावे लागू शकते. इशान किशनच्या अनुपस्थितीमुळे केएल राहुल यष्टीरक्षक फलंदाज म्हणून खेळणार हे निश्चित आहे. त्यामुळे सूर्या आणि अय्यरपैकी एकालाच प्लेइंग-11 मध्ये स्थान मिळू शकेल.