Indian squad: न्यूझीलंड-ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकांसाठी भारतीय संघ जाहीर ; ‘या’ खेळाडूंना मिळाली संधी

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । १४ जानेवारी । भारत आणि न्यूझीलंड संघात होणाऱ्या वनडे आणि टी-२० मालिकेसाठी भारतीय संघ जाहीर करण्यात आला. त्याचबरोबर ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळल्या जाणाऱ्या कसोटी मालिकेतील पहिल्या दोन सामन्यासाठी देखील टीम इंडियाची घोषणा केली आहे. बीसीसीआयने हे तीन संघ शुक्रवारी जाहीर केले. ज्यामध्ये काही खेळाडूंचे पुनरागमन झाले, तर काही खेळाडूंना वगळण्यात आले.

भारत आणि न्यूझीलंड संघातील वनडे मालिकेत तीन सामने खेळले जाणार आहेत. या मालिकेला १८ जानेवारीपासून होईल. तसेच या मालिकेत संघाची धुरा रोहित शर्माकडे असणार आहे. त्यानंतर तीन सामन्यांच्या टी-२० मालिकेला २७ जानेवारीपासून सुरुवात होईल. या मालिकेतील कर्णधारपदाची जबाबदारी हार्दिक पांड्याकडे सोपवण्यात आली आहे. तसेच ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी मालिकेला ९ फेब्रुवारीपासून सुरुवात होईल. धुरा पुन्हा एकदा रोहित शर्माच्या खांद्यावर सोपवण्यात आली आहे.

एकदिवसीय संघात भरतला मिळाली संधी –
यष्टीरक्षक फलंदाज केएल राहुल न्यूझीलंडविरुद्धच्या वनडे मालिकेचा भाग नाही. त्याच्या जागी केएस भरतला संधी देण्यात आली आहे, जो यष्टीरक्षक म्हणून संघासोबत राहणार आहे. केएल राहुल कदाचित त्याच्या लग्न सराईच व्यस्त असणार आहे. त्याचबरोबर अष्टपैलू शाहबाज अहमदलाही संघात स्थान मिळाले आहे. तसेच पुढील कसोटी मालिका डोळ्यासमोर ठेवून अक्षर पटेलला विश्रांती देण्यात आली आहे. दरम्यान शार्दुल ठाकूरचे भारतीय संघात पुनरागमन झाले. केएल राहुल आणि अक्षर पटेल आपल्या कौटुंबिक कामामुळे उपलब्ध असणार नसल्याची माहिती बीसीसीआयने दिली आहे.

न्यूझीलंडविरुद्धच्या वनडे मालिकेसाठी भारतीय संघ:
रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल, इशान किशन, विराट कोहली, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, केएस भरत (यष्टीरक्षक), हार्दिक पंड्या (उपकर्णधार), वॉशिंग्टन सुंदर, शाहबाज अहमद, शार्दुल ठाकूर, युझवेंद्र चहल, कुलदीप यादव, मोहम्मद शमी , मोहम्मद सिराज आणि उमरान मलिक.

पृथ्वी शॉचे टी-२० संघात पुनरागमन –
पृथ्वी शॉचे भारताच्या टी-२० संघात पुनरागमन झाले आहे, तर संजू सॅमसन दुखापतीमुळे वगळल्याची शक्यता आहे. कारण जितेश शर्माची यष्टीरक्षक म्हणून निवड करण्यात आली आहे. या संघात विराट कोहली आणि रोहित शर्माला स्थान देण्यात आलेले नाही. त्यामुळे तर संघाचा कर्णधार म्हणून हार्दिक पांड्या आणि उपकर्णधार सूर्यकुमार यादव जाबाबदारी पार पाडतील.

न्यूझीलंडविरुद्धच्या टी-२० मालिकेसाठी भारतीय संघ:
हार्दिक पंड्या (कर्णधार), सूर्यकुमार यादव (उपकर्णधार), इशान किशन (यष्टीरक्षक), ऋतुराज गायकवाड, शुबमन गिल, दीपक हुडा, राहुल त्रिपाठी, जितेश शर्मा (यष्टीरक्षक), वॉशिंग्टन सुंदर, कुलदीप यादव, युझवेंद्र सिंग चहल, अर्शदीप सिंग उमरान मलिक, शिवम मावी, पृथ्वी शॉ आणि मुकेश कुमार.

सूर्यकुमारला कसोटी मालिकेत मिळाली संधी –

ऋषभ पंतला कार अपघातादरम्यान दुखापत झाली आहे. त्यामुळे कसोटी मालिकेसाटी उपलब्ध नाही. म्हणून ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या दोन कसोटी सामन्यासाठी इशान किशन आणि केएस भरत यांची निवड करण्यात आली. जसप्रीत बुमराहचा संघात समावेश केली नाही. त्याचबरोबर सूर्यकुमार यादवला पहिल्यांदाच कसोटी संघात संधी दिली आहे. मागील मालिकेतील कामगिरीच्या जोरावर जयदेव उनाडकट भारतीय संघात स्थान मिळवण्यात यशस्वी झाला आहे.

रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल (उपकर्णधार), शुबमन गिल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएस भरत (यष्टीरक्षक), इशान किशन (यष्टीरक्षक), आर अश्विन, अक्षर पटेल, कुलदीप यादव, रवींद्र जडेजा, मोहम्मज शमी, मोहम्मद सिराज, उमेश यादव, जयदेव उनाडकट, सूर्यकुमार यादव.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *