उद्धव ठाकरे, सावध रहा, दोन्ही काँग्रेस फसवतील; प्रकाश आंबेडकर यांचा इशारा

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । १४ जानेवारी । मी काँग्रेसला खूप चांगल्या प्रकारे ओळखतो. काँग्रेस आणि शरद पवार यांना चांगल्या प्रकारे ओळखणारा माझ्याएवढा राज्यात दुसरा नेता नाही. ते तुम्हाला फसवतील. शिवसेनेने त्यांच्यासाठी थांबू नये, असा इशारा आम्ही उद्धव ठाकरेंना दिलेला आहे, असे वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी सांगितले.

महापालिका निवडणुकीमध्ये आमची शिवसेनेशी युती झाली आहे. उद्धव ठाकरे यांनी युतीचा अंतिम निर्णय घ्यायचा आहे. मात्र, युती कधी जाहीर करायची, ते ठाकरे यांनी ठरवायचे आहे. ठाकरे यांना काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसला सोबत घ्यायचे आहे. आपण एकत्र पत्रकार परिषद घेऊ, असेही त्यांनी सांगितल्याचे ते म्हणाले.

शिवसेना उद्धव ठाकरे पक्षासोबत युतीची चर्चा सुरू असतानाच आंबेडकर यांनी बुधवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतल्याने आंबेडकर – शिंदे युतीची चर्चा सुरू झाली. मात्र, ही भेट इंदू मिल येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकासंदर्भातच होती. असे सांगत आंबेडकर यांनी गुरुवारी या चर्चेला पूर्णविराम दिला. आगामी निवडणुकांत उद्धव ठाकरे यांच्यासोबतच युती करणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

भाजपची साथ सोडावी, मगच शिंदेंशी चर्चा!
प्रत्येक भेटीगाठी या राजकीयच असतील, असा संबंध जोडणे चुकीचे असल्याचे सांगत प्रकाश आंबेडकर म्हणाले, एकनाथ शिंदे यांनी भाजपची साथ सोडली तरच त्यांच्याशी राजकीय चर्चा होऊ शकते. आम्ही भाजपसोबत कधीही जाणार नाही, याचा पुनरूच्चार त्यांनी केला.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *