केंद्रीय मंत्री Nitin Gadkari यांना जीवे मारण्याच्या धमकीचे कॉल

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि . १४ जानेवारी । केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांना जीवे मारण्याची धमकी (Death Threats) देण्यात आली आहे. नितीन गडकरी यांच्या कार्यालयात (Nitin Gadkaris Nagpur Office) तब्बल तीन वेळा धमकीचा फोन आला. नागपुरात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या ऑरेंज सिटी रुग्णालय जवळच्या जनसंपर्क कार्यालयात हे धमकीचे फोन आले. नितीन गडकरी यांना जीवे मारू अशा आशयाचे हे धमकीचे कॉल होते. मिळालेल्या माहितीनुसार धमकी देणाऱ्याने दाऊद (Dawood Ibrahim) असा शब्द उच्चारत आम्हाला खंडणी (Extortion) दिली नाही तर गडकरींना जीवे मारू अशी धमकी दिली.

सकाळी 11:29 वाजता, 11:35 वाजता आणि 12:32 वाजता असे तीन वेळेला हे धमकीचे कॉल आले. सध्या पोलीस आणि वरिष्ठ पोलीस अधिकारी गडकरी यांच्या जनसंपर्क कार्यालयात पोहोचले आहेत, आणि चौकशी केली जात आहे. मिळालेल्या माहितीप्रमाणे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी नागपुरातच आहेत…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *