लहान मुलांची काळजी घ्या ; वातावरणातील बदलामुळे मुलांमध्ये ‘फ्लू’चे प्रमाण वाढले

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । १५ जानेवारी । शहरात गेल्या दोन आठवड्यांपासून सकाळी थंडी, दुपारी उकाडा, तर रात्री पुन्हा थंडी असे वातावरण असल्याने याचा त्रास लहान मुलांना होत आहे. या वातावरणामुळे सध्या लहान मुलांमध्ये ‘फ्लू’चे प्रमाण वाढले असून, सर्दी, ताप, खोकला, जुलाब, उलट्या होणे या प्रकारचा त्रास मुलांना होत आहे. परिणामी गेल्या पंधरा दिवसांमध्ये शहरातील खासगी आणि सरकारी रुग्णालयांच्या बालरोग विभागातील ‘ओपोडी’मध्ये १५ ते २० टक्के वाढ झाल्याचे बालरोगतज्ज्ञांनी सांगितले.

थंडीच्या वातावरणात विषाणूचा प्रसार जास्त होत असल्याने याकाळात लहान मुलांना संसर्ग होण्याचे प्रमाण अधिक असते; तसेच सध्या लहान मुलांना ‘रोटा’ व्हायरसचाही त्रास होत आहे. वातावरणाच्या बदल्यामुळे मुलांच्या पचनशक्तीवर परिणाम होतो. त्यामुळे जुलाब आणि उलट्यांचा त्रास होतो. यामुळे पालकांनादेखील काय करावे, हे अनेकदा कळत नाही. अशा वेळी ग्लुकोज, सोडियम पोटॅशियम, क्लोराइड आणि सायट्रेट यांचे मिश्रण असलेली पावडर मुलांना द्यावी. विषाणूजन्य आजारामध्ये मुलांना सुरुवातील उलट्या होतात. त्यानंतर ताप येतो आणि २४ तासांत जुलाब होतात. हिवाळ्याच्या दिवसात श्वसनाचे आजारदेखील वाढत असतात. त्यामुळे या काळात लहान मुलांची अधिक काळजी घेण्याची आवश्यक असल्याचे बालरोगतज्ज्ञांनी सांगितले.

तुमच्या घरासाठी उपकरणे- रेफ्रिजरेटर, मायक्रोवेव्ह, वॉशिंग मशीन इत्यादींवर ६५% पर्यंत सूट मिळवा

काय काळजी घ्यावी?

– मुलांना जास्त थंडीच्या ठिकाणी नेणे टाळावे

– आजारी व्यक्तींचा सहवास टाळावा

– खोकताना तोंड व नाक झाकून घ्यावे

– हात स्वच्छ धुवावेत

– संतुलित आहाराचे सेवन करावे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *