देशभरातील सर्व ड्रायव्हरसाठी सक्षम कायद्यांची आवश्‍यकता : बाबा कांबळे

Spread the love

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी – लक्ष्मण रोकडे ।२१ जानेवारी । देशभरात ऑटो, टॅक्‍सी, बस, ट्रक, टेम्पो चालक अशा चालकांची संख्या 22 कोटी पेक्षा अधिक आहे. या घटकांना सामाजिक सुरक्षा मिळाली मिळाले पाहिजे. आरोग्य सुविधा व म्हातारपणी पेन्शनची सुविधा मिळाली पाहिजे. देशभरातील सर्व चालकांसाठी (ड्रायव्हर) सक्षम कायद्यांची आवश्‍यकता आहे, असे प्रतिपादन बाबा कांबळे यांनी केले.

बाबा कांबळे यांच्या अध्यक्षतेखाली पुण्यातील आळंदी देवाची येथे देशभरातील ट्रक टेम्पो बस टॅक्सी ऑटो ड्रायव्हर संघटनांचे व वाहतूक धारकांचे राष्ट्रीय अधिवेशन मोठ्या उत्साहाच्या वातावरणात संपन्न झाले. देशभरातील प्रतिनिधी या कार्यक्रमाला उपस्थित होते. या वेळी मार्गदर्शन करताना बाबा कांबळे बोलत होते.

या वेळी आळंदी शहराचे माजी नगराध्यक्ष रोहिदास तापकीर, डी डी भोसले-पाटील, नगरसेवक प्रकाशन कुराडे, चंद्रकांत कानडे, सोपान गवळी, बळीराम काकडे, घर का महिला सभा अध्यक्ष आशा कांबळे ,मधुरा डांगे, आदीसह मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाला तामिळनाडू, राजस्थान, मध्यप्रदेश, उत्तर प्रदेशसह देशभरातील प्रतिनिधी उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या सुरूवातीला रॅपीडो कंपनीच्या बेकायदेशीर टू व्हीलर, टॅक्‍सीच्या प्रवासी वाहतूकीवर बंदी घालण्याचा निर्णय न्यायालयाने दिला. या मध्ये पाठपुरावा केल्याने सर्व रिक्षा चालक मालकांच्या वतीने महाराष्ट्र रिक्षा पंचायतचे अध्यक्ष बाबा कांबळे यांचा भव्य नागरी सत्कार करण्यात आला. तसेच रिक्षामध्ये मिरवणूक काढत स्वागत करण्यात आले.

बाबा कांबळे म्हणाले की, देशभरातील ट्रक, टेम्पो, बस टॅक्‍सी आदीसह सर्व प्रकारच्या चालकांसाठी राष्ट्रीय आयोग स्थापन करण्यात यावा. शहीद झालेल्या चालकांसाठी दिल्ली येथे राष्ट्रीय स्मारक निर्माण करावे. देशभरात ड्रायवर डे बनवून चालकांचा सन्मान करावा. ऑटो, टॅक्‍सीसह सर्व प्रकारच्या चालकांसाठी केंद्र सरकारने वेल्फेअर बोर्ड स्थापन करावे, अशी मागणी या वेळी बाबा कांबळे यांनी केली.

या अधिवेशनात महाराष्ट्र रिक्षा पंचायत रिक्षा ब्रिगेड पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष पदी संतोष गुंड यांची नियुक्ती करण्यात आली. यावेळी त्यांचा रिक्षा चालकांच्या वतीने भव्य सत्कार केला. तसेच कार्याध्यक्ष पदावर जालिंदर गवारे यांची नियुक्ती करण्यात आली.

पुणे जिल्हा अध्यक्ष लक्ष्मण शेलार, रिक्षा ब्रिगेड प्रमुख बाळासाहेब ढवळे, शहर अध्यक्ष संतोष गुंड, विनायक ढोबळे, मल्हार काळे, सुलतान शेख, रामदास मेत्रे, राहुल कुराडे, सिद्धेश्वर सोनवणे, सुरज सोनवणे, दिनेश तापकीर, संदीप कुरुंद, रोहिदास कांबळे, रोहिदास स्वप्निल कांबळे आदींनी कार्यक्रमाचे संयोजन केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *