“वाघ एकला राजा, बाकी खेळ माकडांचा…”, सुषमा अंधारेंनी शेअर केलेले दोन फोटो चर्चेत

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि . २१ जानेवारी । शिवसेनेच्या (ठाकरे गट) उपनेत्या सुषमा अंधारे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मुंबई दौऱ्यातील एक फोटो शेअर करत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना टोला लगावला. “वाघ एकला राजा, बाकी खेळ माकडांचा…”, असं म्हणत सुषमा अंधारेंनी दोन फोटो शेअर केले. तसेच यातून एकनाथ शिंदेंना लक्ष्य केलं.

सुषमा अंधारेंनी ट्वीट केलेला पहिला फोटो जुना आहे. यात नरेंद्र मोदी मुंबईत आले तेव्हा शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना वाकून नमस्कार करताना दिसत आहेत. तसेच दुसरा फोटो नरेंद्र मोदींच्या नुकत्याच झालेल्या मुंबई दौऱ्यातील आहे. या फोटोत एकनाथ शिंदे मोदींना वाकून नमस्कार करताना दिसत आहेत.

सुषमा अंधारे यांनी हे दोन्ही फोटो ट्वीट करताना ‘हाच तो फरक’ म्हणत बाळासाहेब ठाकरे असताना त्याचं राजकीय स्थान आणि एकनाथ शिंदे यांचं राजकीय स्थान यावरून खोचक टोला लगावला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *