महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी ।२२ जानेवारी । आजकाल प्रत्येक घरात Electronic Devices चा वापर वाढला असून यामुळे वाढते लाईट बिल अनेकांची डोकेदुखी बनले आहे. अशा परिस्थितीत प्रत्येकाला घराचे वीज बिल कमी करायचे असते. परंतु, अनेक उपकरणांच्या सतत वापरामुळे हे शक्य होत नाही. पण, काळजीचे कारण नाही. कारण आता नवीन मीटर येणार आहे. ज्याच्या मदतीने तुम्हाला वीज बचतीसाठी खूप मदत मिळणार आहे. चला तर जाणून घेऊया कोणता आहे हा खास मीटर…
Smart Electricity Meter लवकरच येणार
रिपोर्ट्सनुसार, स्मार्ट मीटर लवकरच वीज आणि गॅससाठी वापरण्यात येणार आहे. ऊर्जा पुरवठादारांनीही त्याचा वापर सुरू केला आहे. यूकेमध्ये असे मीटर बसवले जात आहेत. ब्रिटनची ऊर्जा प्रणाली अपग्रेड करण्याच्या बाबतीत हे मीटर वापरले जात आहेत. क्रेडिट स्मार्ट मीटर देखील लवकरच स्थापित केले जातील आणि तुम्हाला वीज वापरण्यापूर्वी त्याचे पैसे द्यावे लागणार आहेत.
Smart Meter Handy In-Home Display सह येईल. म्हणजे संपूर्ण रिपोर्ट तुमच्या मोबाईलवरच येईल आणि याच्या मदतीने तुम्हाला किती वीज बिल येणार आहे हे कळू शकेल. स्मार्ट मीटर पूर्णपणे Automatic Meter Reading प्रदान करते. एक मीटर गॅससाठी आणि दुसरे मीटर विजेसाठी घरामध्ये बसवले जाईल आणि मीटर आपोआप तुमच्या वापराचा अहवाल पुरवठादाराला पाठवेल.
सध्या, असे मीटर भारतात उपलब्ध नाहीत. पण लवकरच भारतातील अनेक शहरांमध्येही असे मीटर बसवले जातील. पण यूकेमधील वीज कंपन्यांनीही असे मीटर वापरकर्त्यांच्या घरात बसवण्यास सुरुवात केली आहे. या मीटर्सचे वैशिष्ट्य म्हणजे बिल येण्यापूर्वीच तुमच्या मोबाईलवर रिपोर्ट येत राहिल. तुम्हाला वीज बिल कमी करायचे असले तरी ते तुमच्यासाठी खूप सोपे होणार आहे.