महाराष्ट्र 24 – ऑनलाईन- विशेष प्रतिनिधी- ओमप्रकाश भांगे – लातूर जिल्हातील उदगिर येथे कोरोना आजारावर उपचार चालू असताना एका ६५ वर्ष वयाच्या इसमाचा आज दु. १.४५ वा. मृत्यू झाला आहे.कोरोनापासून मुक्तीसाठी संपूर्ण जिल्हा प्रयत्नकरत असताना हा एक मोठा धक्का आहे.
या रूग्णास हायपरटेन्शन,न्यूमिनिया, मधूमेह हे आजार होते. कोरोनाचा दुसरा बळी ठरलेल्या या रूग्णावर उपचार चालू असताना चौथ्या दिवशी त्याचा मृत्यू झाला.उदगीर येथे कोरोनाने एका ७० वर्षीय महिलेचा २५ एप्रील २० रोजी मृत्यू झाला होता.लातूर जिल्हामध्ये कोरोनाने मृत्यू पावलेल्यांची संख्या दोन झाली आहे.लाॅकडाऊनच्या तिसरा टप्पातील शेवटच्या दिवशी ही घटना घडली आहे.उद्यापासून लॅकडाऊन ४.० चालू होत आहे.
