बुलढाणा ; दुकानांमध्ये एकाच ठिकाणी होणारी गर्दी कमी करणे आवश्यक;जिल्हाधीकारी सुमन चंद्रा

Spread the love

Loading

महाराष्ट्र 24 ऑनलाईन- विशेष प्रतिनिधी – गणेश भड- बुलढाणा दि. 17 : कोरोना विषाणू संसर्ग रोखण्यासाठी राज्य शासनाने 31 मे 2020 पर्यंत टाळेबंदी (लॉकडाऊन) जाहीर केले आहे. तसेच राज्यात व जिल्ह्यात साथरोग अधिनियम 1897 लागू करण्यात आला आहे. कोरोना विषाणूच्या अनुषंगाने रूग्णांच्या संख्येमध्ये वाढ होत असल्याचे निदर्शनास येत आहे. दुकानांच्या पूर्वीच्या सकाळी 7 ते सायं 7 या वेळेचा कालावधी दुकानांवरील एकाच ठिकाणी होणारी गर्दी थांबविण्यासाठी कमी करणे आवश्यक आहे.  जिल्हाधिकारी सुमन चंद्रा यांनी जिल्ह्यात 31 मे 2020 पर्यंत जमावबंदी आदेश लागू आहेत. तसेच मागील 7 मे रोजी दिलेल्या आदेशानुसार परवानगी दिलेल्या व प्रतिबंधीत केलेल्या सर्व बाबींना बदल केलेला वेळ लागू करण्यात आला आहे. प्रतिबंधीत क्षेत्र अर्थात कंटेन्टमेंट झोनमधील सर्व दुकाने, आस्थापना बंद असणार आहे. 

जिल्ह्यातील सर्व दुकाने आता सकाळी 8 ते दुपारी 2 यावेळेत सुरू राहणार आहेत. त्यामध्ये किराणा, भाजीपाला, दुध व तत्सम, कृषी व बांधकाम साहित्य, सिलबंद मद्यविक्री आदी दुकाने यावेळेत सुरू राहतील. तसेच जिल्ह्यातील वैद्यकीय आस्थापना, मेडीकल, लॅब, दवाखाने, ॲम्बुलन्स सेवा आदी तसेच राष्ट्रीय व राज्य महामार्गावरील नगर पालिका / परिषद क्षेत्राबाहेरील पेट्रोल पंप 24 तास सुरू राहणार आहेत. जिल्ह्यातील नगर पालिका क्षेत्रातील सर्व स्टँण्ड अलोन दुकाने (स्वतंत्र), कॉलनी व रहीवासी भागातील सर्व दुकाने सकाळी 8 ते दुपारी 2 या वेळेत सुरू राहतील. परंतु या भागात सलग पाच पेक्षा जास्त दुकाने ओळीत उघडी राहणार नाहीत, याची संबंधीत नगर पालिका मुख्याधिकारी यांनी दक्षता घ्यावी.

   जर ओळीत अशी पाच पेक्षा जास्त दुकाने असतील तर यापैकी केवळ अत्यावश्यक वस्तु व सेवांची दुकाने सुरू राहतील. तसेच ग्रामीण भागात सर्व दुकाने याच वेळेत सुरू राहतील. उपरोक्त परवानगी असलेली सर्व दुकाने प्रतिबंधीत क्षेत्रात सुरू राहणार नाहीत. या आदेशाचे उल्लंघन केल्यास संबंधीतांवर आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005, भारतीय साथ रोग अधिनियम 1897, भारतीय दंड संहीता १८६० चे कलम 188 अंतर्गत दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे, असे जिल्हादंडाधिकारी यांनी कळविले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *