महाराष्ट्र २४ – ऑनलाईन – पुणे – विशेष प्रतिनिधी – ओमप्रकाश भांगे – पुण्यात याआधी सर्वाधिक १६६ आणि त्यानंतर शनिवार २०२ रुग्ण सापडले होते. पुण्यात आपल्या वाढीचा वेग दुसऱ्या दिवशी म्हणजे, रविवारीही (ता.१७) कायम ठेवल्याने दिवसभरात नव्या २०१ रुग्णांची भर पडली आहे. तर गेल्या आठवड्यात पुणेकरांच्या आशा वाढविलेल्या कोरोनामुक्तांची संख्या कमी होऊन दिवसभरात ५३ बरे झाले आहेत. तर जवळपास दीडशे रुग्णांची स्थिती गंभीर असून, नऊ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. नवे रुग्ण आणि मृतांचे आकडे वाढल्याने पुणेकरांत पुन्हा भीती वाढली आहे.
सध्या रोज दीडशे हजार लोकांची तपासणी होत असल्याने रुग्ण संख्या वाढत असल्याचे दिसून येत आहे. पण, कोरोनामुक्तांची रविवारी कमी झाली असली तरी, एरवी ती आहेत, असे महापालिकेच्या आरोग्य विभागाने स्पष्ट केले.
कोरोनामुक्तांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत गेल्याने पुणेकरांमधील भीती कमी झाली होती. मात्र, शनिवारपासून अचानक नव्या रुग्णांची संख्या वाढत असल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट झाले आहे. त्यात पुन्हा २०१ रुग्ण वाढले आहेत. त्याशिवाय आतापर्यंत विविध रूग्णालयात उपचार घेत असलेले ९ जणांचा मृत्यू झाला; पुणे शहरात तपासणी करण्यात आली आहे. त्यातील ३ हजार ४९६ जणांना कोरोना झाला आहे.