लॉकडाऊनच्या चौथ्या टप्प्यामध्ये नियमांचे कठोर पालन करावेः केंद्रीय गृह सचिव

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ – ऑनलाईन – पुणे – विशेष प्रतिनिधी – लक्ष्मण रोकडे – केंद्र सरकारने लॉकडाऊन ३१ मेपर्यंत वाढवल्यानंतर त्याच्या चौथ्या टप्प्यासाठी नियमावलीही जाहीर केली. नियमावली जाहीर केल्यानंतर केंद्रीय कॅबिनेट सचिव राजीव गौबा यांनी विविध राज्यांच्या मुख्य सचिवांशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधला. अडकून पडलेल्या स्थलांतरीत मजुरांना त्यांच्या गावी सोडण्यासाठी सर्व राज्यांनी सहकार्य करावं, असं आवाहन गौबा यांनी राज्यांना केलं. यासोबतच रेड, ग्रीन आणि ऑरेंज झोनबाबत त्यांनी राज्यांशी चर्चाही केली. तसंच रेड, ग्रीन आणि ऑरेंज झोनमधील व्यवहारांच्या मुद्द्यावरही त्यांनी चर्चा केली.

लॉकडाऊनचा चौथा टप्पा उद्यापासून सुरू होत असल्याने कॅबिनेट सचिव राजीव गौबा यांनी विविध राज्यांच्या वरिष्ठि अधिकाऱ्यांशी चर्चा करत त्यांची मतंही जाणून घेतली. तर केंद्रीय गृह सचिव अजय भल्ला यांनी सर्व राज्य आणि केंद्र शासित प्रदेशांच्या मुख्य सचिवांना पत्र लिहिलंय. लॉकडाऊन ३१ मेपर्यंत वाढवण्यात आल्याने त्याच्या नियमांचे काटेकोरपणे पालन करावे, असे निर्देश त्यांनी दिले आहेत. केंद्र सरकारच्या मार्गदर्शक सूचना कमी करू नयेत, असं आवाहनही त्यांनी केलंय.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *