राशिद खानचा धमाका, वयाच्या अवघ्या 24 व्या वर्षी केली कमाल, T20 मध्ये रचला अप्रतिम विक्रम

Spread the love

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि . २४ जानेवारी । राशिद खानने टी-20 क्रिकेटमध्ये नेत्रदीपक कामगिरी केली आहे. वयाच्या अवघ्या 24 व्या वर्षी राशिदने आपल्या T20 कारकिर्दीत 500 विकेट्स घेतल्या आहेत. T20 क्रिकेटमध्ये 500 विकेट घेणारा राशिद हा जगातील दुसरा गोलंदाज आहे. त्याच्या आधी हा पराक्रम वेस्ट इंडिजच्या ड्वेन ब्राव्होने केला होता. ब्राव्होने टी-20 क्रिकेटमध्ये आतापर्यंत 614 विकेट घेतल्या आहेत. राशिदने आपल्या 8 वर्षांच्या कारकिर्दीत टी-20 मध्ये 500 विकेट्स घेण्याची अप्रतिम कामगिरी केली आहे.

T20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट्स:

614 – ब्राव्हो (556 सामने)
500* – राशिद खान (371)
474 – नरेन (435)
466 – ताहिर (373)
436 – शाकिब (389)
401 – वहाब (335)

राशिदने दक्षिण आफ्रिकेत खेळल्या जात असलेल्या टी-20 लीगमध्ये 500 टी-20 विकेट्स पूर्ण केल्या. प्रिटोरिया कॅपिटल्सविरुद्धच्या सामन्यात एमआय कॅपिटल्सकडून खेळताना त्याने 4 षटकात 16 धावा देऊन 3 बळी घेतले होते. तसे तर राशिद खानच्या नेतृत्वाखालील एमआय कॅपिटल्सच्या संघाला या सामन्यात पराभवाला सामोरे जावे लागले होते, मात्र राशिदच्या या विक्रमाने जागतिक क्रिकेटला चकित केले आहे.

राशिद खान टी-20 क्रिकेटच्या इतिहासात 500 विकेट घेणारा सर्वात तरुण गोलंदाज बनला आहे. असे करून त्याने जगाला चकित केले आहे. सोशल मीडियावर राशिदच्या कारनाम्याने चाहत्यांना धक्का बसला आहे. राशिदने अशीच कामगिरी करत राहिल्यास करिअरमध्ये 1000 हून अधिक टी-20 विकेट्स घेण्यात तो यशस्वी होऊ शकतो, असा विश्वास लोकांचा आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *