(औरंगाबाद) संभाजीनगर @१०७३, आज ५१ रुग्णांची वाढ

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ – ऑनलाईन – संभाजीनगर – विशेष प्रतिनिधी – आनंद चौधरी – : संभाजीनगर मध्ये करोनाचा विळखा वाढतच चालला आहे. औरंगाबादमधील करोनाबाधितांची संख्या हजारांच्या पुढे गेली आहे. जिल्ह्यात आज ५१ करोनाबाधित रुग्णांची वाढ झाल्याने जिल्ह्यात आढळलेल्या एकूण रुग्णांची संख्या १०७३ झाल्याचे जिल्हा प्रशासनाने कळवले आहे. आज आढळलेल्या रुग्णांमध्ये १७ महिला व ३४ पुरुषांचा समावेश आहे.

आतापर्यंत ३१२ रुग्ण बरे होऊन घरी परतल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली. महानगरपालिकेच्या कोविड केअर सेंटर, जिल्हा सामान्य रुग्णालय (मिनी घाटी) आणि शासकीय वैद्यकीय रुग्णालय व महाविद्यालय (घाटी) या ‍ठिकाणी कोरोनाबाधितांवर उपचार सुरू आहेत. या यंत्रणेतील डॉक्टर्स, परिचारिका, ब्रदर्स, आरोग्य कर्मचारी, सेवक आदी कोरोना वॉरिअर्सच्या अथक परिश्रमातून व यशस्वी उपचारानंतर आजपर्यंत एकूण ३१२रुग्ण बरे होऊन घरी परतलेले आहेत. महापालिकेच्या कोविड केअर सेंटरमधून आतापर्यंत सर्वात अधिक म्हणजे १८० रुग्ण बरे होऊन घरी परतलेले आहेत. तर जिल्हा सामान्य रुग्णालयातून ११२ रुग्ण बरे झालेले आहेत. तसेच घाटीतून २०रुग्ण बरे झालेले आहेत, असेही कळविलेले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *