महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । ५ फेब्रुवारी । पुणे बंगरूळू राष्ट्रीय महामार्गावरील कराड कोल्हापूर नाका येथील उड्डाणपूल पाडण्यास सुरुवात झाली आहे. अवघ्या काही तासांत या मार्गावरील वाहतूक बंद होणार आहे. त्यामुळे पुण्याहून कोल्हापूरच्या दिशेने जाणाऱ्या आणि कोल्हापूरकडे जाणाऱ्या प्रवाशांना आता पर्यायी रस्त्याचा वापर करावा लागणार आहे. त्यामुळे वाहतुकीवर मोठा ताण येण्याची शक्यता आहे. सहा लेनचा हा रस्ता आणि पुल होणार असून यासाठी सुमारे 550 कोटी रूपये खर्च केला जाणार आहे.