Pervez Musharraf passes away : पाकिस्तानचे माजी राष्ट्राध्यक्ष परवेज मुशर्रफ यांचं निधन

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । ५ फेब्रुवारी । पाकिस्तानचे माजी राष्ट्राध्यक्ष परवेज मुशर्रफ यांचं निधन झाले आहे. दुबईतील रुग्णालयात दीर्घ आजाराने त्यांचे निधन झाले. मुशर्रफ यांना हृदय आणि इतर वयोमानानुसार आरोग्याच्या समस्या होत्या. परवेझ मुशर्रफ यांनीच १०९९ मध्ये तत्कालीन पंतप्रधान नवाझ शरीफ यांना न सांगता भारताविरुद्ध कारगिल युद्ध सुरू केले होते. लष्करप्रमुख असताना त्यांनी सत्तापालट करून पाकिस्तानात मार्शल लॉ जाहीर केला होता.

परवेझ मुशर्रफ यांचा जन्म ११ ऑगस्ट १९४३ रोजी नवी दिल्लीतील दर्यागंज येथे झाला होता. १९४७ मध्ये त्यांच्या कुटुंबाने पाकिस्तानला जाण्याचा निर्णय घेतला. फाळणीच्या काही दिवस आधी त्यांचे संपूर्ण कुटुंब पाकिस्तानात पोहोचले होते. त्याचे वडील सईद पाकिस्तानच्या नव्या सरकारसाठी काम करू लागले आणि परराष्ट्र मंत्रालयाशी संबंधित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *