जानेवारीत सेवा क्षेत्राचा वेग मंदावला

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । ५ फेब्रुवारी । वर्ष 2023 च्या सुरुवातीला सेवा क्षेत्राची गती काहीशी मंदावली आहे. नवीन डाटाच्या सेवा क्षेत्राच्या कामगिरीवर लक्ष दिल्यास मोठय़ा कंपन्यांच्या उत्पादनात कोणताही बदल झालेला नसल्याचेही यावेळी एस ऍण्ड पी या ग्लोबल मार्केट इंटेलिजन्सच्या अर्थशास्त्राच्या सहयोगी संचालक, पोल्याना डी लिमा यांनी सांगितले आहे.

यासोबतच नवीन व्यवसाय वाढवण्यात देशांतर्गत बाजारपेठेचा अधिक वाटा असल्याचे सर्वेक्षणात पुढे आले आहे. त्याचवेळी, आंतरराष्ट्रीय बाजारात ऑर्डर कमी झाल्याचेही सदरच्या अहवालात स्पष्ट करण्यात आले आहे.

कसे होते सर्वेक्षण?

एस ऍण्ड पी या ग्लोबल इंडिया सर्व्हिसेस पीएमआय व एस ऍण्ड पी ग्लोबल द्वारे सादर केले जाते. या अहवालामध्ये एकूण 400 सेवा क्षेत्रातील कंपन्यांचा डाटा आहे. प्रत्यक कर्मचाऱयांच्या आकाराच्या कंपन्या त्याच्या पॅनेलमध्ये समाविष्ट केल्या आहेत. डिसेंबर 2005 पासून ही आकडेवारी सादर करण्यात येते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Facebook
  • X (Twitter)
  • LinkedIn
  • Mix
  • More Networks
Copy link