SSC Exam: आजपासून मिळणार दहावीचे हॉलतिकीट

Spread the love

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । ६ फेब्रुवारी । माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात येणाऱ्या दहावीच्या परीक्षांचे (SSC Exam) हॉलतिकीट विद्यार्थ्यांना आज दुपारी तीन वाजता शाळेच्या लॉगइनमधून उपलब्ध करून दिले जाणार आहेत. अशी माहिती राज्य मंडळाच्या वतीने देण्यात आली. दहावीच्या लेखी परीक्षेस 2 मार्च पासून सुरुवात होणार आहे. तत्पूर्वी 10 फेब्रुवारीपासून प्रात्याक्षिक परीक्षांना सुरुवात होत आहे. या परीक्षेसाठी आवश्यक असलेल्या हॉलतिकीटचे वितरण आजपासून करण्यात येणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना आपल्या शाळेत आज हॉलतिकीट मिळणार आहे.

शाळेकडून विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या हॉलतिकीटवर सही आणि शिक्का असावा, तसेच हॉलतिकीटची ऑनलाइन प्रिंट देताना शाळांनी कोणत्याही प्रकारचे शुल्क विद्यार्थ्यांना आकारू नये. प्रिंटवर मुख्याध्यापकांची सही आणि शिक्का असावा. हॉलतिकीटमध्ये विषय व माध्यम बदल असल्यास त्यांच्या दुरुस्त्या माध्यमिक शाळांनी विभागीय मंडळात जाऊन करून घ्यावयाच्या आहेत. तसेच फोटो, स्वाक्षरी, विद्यार्थ्यांचे नाव, जन्मतारीख आणि जन्मस्थळ या संदर्भातील दुरुस्त्या माध्यमिक शाळांनी त्यांच्या स्तरावर करून त्याची एक प्रत विभागीय मंडळाकडेत्वरित पाठवावे असेही मंडळाकडून म्हटले आहे.

अनकेदा परीक्षादरम्यान विद्यार्थ्यांकडून हॉलतिकीट गहाळ होण्याच्या घटना देखील समोर आल्या आहे. त्यामुळे हॉलतिकीट गहाळ झाल्यास संबंधित माध्यमिक शाळांनी पुन्हा प्रिंट काढून त्यावर लाल शाईने द्वितीय प्रत असा शेरा देऊन विद्यार्थ्यास प्रवेशपत्र द्यावयचे आहे. फोटो सदोष असल्यास त्यावर विद्यार्थ्यांचा फोटो चिकटवून त्यावर संबंधित मुख्याध्यापकांनी शिक्का मारून स्वाक्षरी द्यावी, असेही राज्यमंडळाच्या सचिव अनुराधा ओक यांनी दिलेल्या पत्रात म्हटले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *