शिवनारायण चंद्रपॉलच्या लेकाची कसोटीत रेकॉर्डब्रेक खेळी, वेधले क्रिकेट जगताचं लक्ष

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । ६ फेब्रुवारी । दिग्गज फलंदाज शिवनारायण चंद्रपॉलचा मुलगा तेगनारायण चंद्रपॉल याने नुकतेच ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी मालिकेतून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. दरम्यान, झिम्बाब्वेविरुद्ध सुरू असलेल्या पहिल्या कसोटी सामन्यामध्ये तेगनारायण चंद्रपॉलने शतकी खेळी केली. त्याबरोबरच त्यांनी कसोटी क्रिकेटमध्ये शतकी खेळी करणाऱ्या मोजक्या पितापुत्रांमध्ये स्थान मिळवले आहे.

झिम्बाब्वेविरुद्ध खेळवण्यात येत असलेल्या कसोटी सामन्यामध्ये वेस्ट इंडिजने सावध फलंदाजी करताना ८९ षटकांमध्ये बिनबाद २२१ धावा काढल्या आहेत. त्यामध्ये शिवनारायण चंद्रपॉलचा मुलगा तेगनारायण चंद्रपॉलने २९१ चेंडूत १०१ धावांची खेळी केली. यादरम्यान, त्याने १० चौकार आणि १ षटकार ठोकला. तेगनारायणबरोबरच सलामीवीर क्रेग ब्रेथवेट यानेही शतकी खेळी केली. त्याने २४६ चेंडूत ११६ धावा केल्या. या खेळीमध्ये ब्रेथवेटने ७ चौकार ठोकले. पावसामुळे दुसऱ्या कसोटी सामन्यामध्ये दोन दिवसांमध्ये मिळून केवळ ३८ षटकांचाच खेळ झाला आहे.

तेगनाराणय चंद्रपॉलचे वडील शिवनारायण चंद्रपॉल हे वेस्ट इंडिजचे दिग्गज फलंदाज होते. त्यांनी वेस्ट इंडिजकडून १६४ कसोटी सामन्यांमध्ये ११ हजार ८६७ धावा फटकावल्या होत्या. त्यामध्ये ३० शतकांचा समावेश होता. शिवनारायण चंद्रपॉल यांना त्यांच्या पहिल्या कसोटी शतकासाठी ८ वर्षे आणि ५२ डावांपर्यंत वाट पाहावी लागली होती. मात्र तेगनारायणने केवळ पाचव्या डावात आपले पहिले कसोटी शतक फटकावले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *