महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि . ८ फेब्रुवारी । १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याची किंमत आज रुपये ५२,७६० असून मागील ट्रेडमध्ये ह्या मौल्यवान धातूची किंमत ५२,७५० रुपये प्रति १० ग्रॅमवरवर बंद झाली होती. गुड रिटर्न्स या वेबसाइटनुसार चांदी ७१,४०० रुपये प्रति किलोने विकली जात आहे. मागील ट्रेडमध्ये चांदीची किंमत ७१,३०० रुपये प्रतिकिलो होती. उत्पादन शुल्क, राज्य कर आणि मेकिंग शुल्कामुळे सोन्याच्या दागिन्यांच्या किंमती भारतभर बदलतात.
गुड रिटर्न्स वेबसाईटनुसार, पुण्यात प्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर ५२,७६० असेल तर २४ कॅरेट सोन्याचा दर ५७,५६० रुपये असेल. मुंबईमध्ये २२ कॅरेट सोन्याची किंमत प्रति १० ग्रॅम ५२,७६० रुपये आहे. मुंबईत २४ कॅरेट सोन्याची किंमत ५७,५६० प्रति १० ग्रॅम आहे. नागपूर मध्ये प्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर ५२,७६० तर २४ कॅरेट सोन्याचा दर ५७,५६० रुपये इतका असेल. नाशिकमध्ये २२ कॅरेट सोन्याचा दर ५२,७९० आहे तर प्रति १० ग्रॅम २४ कॅरेट सोन्याचा दर ५७,५८० रुपये आहे. चांदीचा आजचा प्रती १० ग्रॅमचा दर ७१४ रुपये आहे.
(वरील सोन्याचे दर सूचक आहेत आणि त्यात जीएसटी, टीसीएस आणि इतर करांचा समावेश नाही. अचूक दरांसाठी तुमच्या स्थानिक ज्वेलरशी संपर्क साधा.)