रिफायनरी विरोधात बातमी दिल्याच्या कारणावरुन ठार मारणाऱ्या आरोपीस अटक करण्याची पत्रकारांची मागणी

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि . ८ फेब्रुवारी । उस्मानाबाद प्रतिनिधी सलमान मुल्ला – रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर येथील पत्रकार शशिकांत वारीशे यांनी रिफायनरी प्रकल्प विरोधात बातमी दिल्यामुळे अंगावर चारचाकी वाहन घालून जाग्यावर ठार मारले आहे. त्यामुळे त्याच्या मृत्यूस कारणीभूत असलेल्या आरोपींवर योग्य ती कारवाई करून तात्काळ अटक करण्यात यावी अशी मागणी व्हॉइस ऑफ मीडियाच्यावतीने मुख्यमंत्र्यांकडे एका निवेदनाद्वारे दि.८ फेब्रुवारी रोजी केली आहे.

दिलेल्या निवेदनात असे नमूद करण्यात आले आहे की, रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर येथील दैनिक महानगरी टाईम्सचे पत्रकार शशिकांत वारीशे यांनी रिफायनरी विरोधात वृत्त दिले होते. त्यामुळे राजापूर हायवे येथे रिफायनरी समर्थक जमीन दलाल यांनी शशिकांत वारीशे यांच्या अंगावर वाहन घालून मृत्यूस कारणीभूत ठरल्यामुळे दोषी आरोपी गावगुंड याच्यावर सदोष मनुष्यबादाचा गुन्हा दाखल झाला आहे. मात्र त्याला अद्यापपर्यंत अटक केली नसून तो मोकाट फिरत असल्यामुळे त्या आरोपींना तात्काळ अटक करून कडक कारवाई करण्यात यावी. तसेच पत्रकार संरक्षण कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल करून त्या आरोपीस कडक शासन करण्यात यावे, अशी मागणी केली आहे. यावर जिल्हाध्यक्ष हुंकार बनसोडे, कार्याध्यक्ष रहीम शेख, उस्मानाबाद तालुकाध्यक्ष अमजद सय्यद, मल्लिकार्जुन सोनवणे, राहुल कोरे, पांडुरंग मते, कुंदन शिंदे, प्रशांत मते, अजित माळी, किशोर माळी, सलीम पठाण, सतीश मातने, जफर शेख आदी पत्रकारांच्या सह्या आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *