महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । १२ फेब्रुवारी । अजय विघे | कोपरगाव नगर पालिका मैला मिश्रित सांड पाणी गोदावरी नदी पात्रात सोडत असून त्यामुळे नदी पात्रातील अनेक मासे मृत्यूमुखी पडले असून नगर पालिकेने सांड पाण्याचा बंदोबस्त करावा अशी मागणी कोपरगाव येथील विविध सामाजिक संघटना च्या वतीने एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे केली आहे.
आज गोदा माई प्रतिष्ठानच्या वतीने आदिनाथ ढाकणे यांनी गोदापात्र स्वच्छतेचे 201 व्या आठवड्या निमित्ताने कार्यक्रमाचे आयोजन केले होते हा कार्यक्रम गोदावरी नदी पात्रात आयोजित केला होता त्या निमीत्ताने उपस्थित असताना गोदावरी नदीच्या पात्रात अनेक मासे कासावीस होऊन नदी पात्राच्या कडेला येऊन मरत आहे.
कोपरगाव नगर पालिकेने मल निस्सारण करण्या बाबत आता पर्यंत काही एक उपाय योजना केली नसून कोपरगाव शहराचे मैला मिश्रित पाणी गोदावरी नदीच्या पात्रात सोडले जात आहे केंद्र व राज्य सरकार नदीची स्वच्छता व मलनिस्सारण प्रकल्प उभारण्यासाठी विविध ठिकाणी लाखो रुपये खर्च करत आहे तसेच केंद्र सरकार देखील नदी स्वच्छते साठी निधी देत असताना कोपरगाव नगर पालिकेच्या निष्काळजी व बेजबाबदार कारभारामुळे आता पर्यंत यावर कोणतीही उपाय योजना केली नाही त्यामुळे नदीतील लाखो मासे मरत आहेत त्याच प्रमाणे इतर जीव वृष्टी देखील ऱ्हास पावत आहे.
कोपरगाव येथील सामाजिक कार्यकर्ते सतत चार वर्षांपासून दर आठवड्यातून एक दिवस गोदामाई स्वच्छतेची मोहीम राबवित आहे त्यामुळे आता तरी नगर पालिकेने या बाबत गांभीर्याने विचार करून मलनिस्सारण प्रकल्प उभा करण्यासाठी पाऊल उचलावे अन्यथा महाराष्ट्र राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे या बाबत तक्रार करण्यात येईल असेही या पत्रकात कोपरगाव तालुका कृती समितीचे तुषार विध्वंस,भूमी पुत्र फाउंडेशन चे निसार शेख यांनी म्हटले आहे.