महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । १२ फेब्रुवारी । लक्ष्मण रोकडे |”चिंचवड पोटनिवडणुकीत राहुल कलाटे यांना महाविकास आघाडीतर्फे उमेदवारी न मिळाल्याने राजीनामा देत आहे असे साकी गायकवाड म्हणाले”
विशाल ( साकीभाऊ ) गायकवाड हे गेली १४ ते १५ वर्षापासून राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी पक्षाचा प्रामाणिक व निष्ठावंत कार्यकर्ता म्हणून एकनिष्ठेने काम करत आहे. शरद पवार साहेब, आजितदादा पवार आणि सुप्रियाताई सुळे यांचे विचार समाजातील तळागाळातील घटकांपर्यत पोहचविण्याचे काम प्रामाणिकपणे ते करत होते. तसेच पक्षाचे प्रत्येक आंदोलनात सहभाग घेऊन पक्षवाढीसाठी तन-मन-धनाने काम केले. त्याचप्रमाणे प्रत्येक निवडणुकीमध्ये समाजामध्ये पक्षाचा प्रचार प्रसार मन लावून केला आहे.
परंतु सध्या चिंचवड विधानसभेच्या पोटनिवडणुकीमध्ये साकी गायकवाड यांना असे वाटत होते की या निवडणुकीसाठी राहुल कलाटे यांना महाविकास आघाडीतर्फे उमेदवारी मिळेल त्यादृष्टीने त्यांनी कामही चालू केले होते. सर्व तरूणवर्ग व समाजातील तळगाळातीला लोकांची अशीच भावना होती. परंतु असे घडले नाही. परंतु स्थानिक पातळीवर शिव-फुले-शाहू-आंबेडकरी चळवळीतील तरूणांनी राहुल कलाटे यांना पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे या निवडणुकीत काम करताना साकी गायकवाड यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील पदाची अडचण निर्माण होत आहे. त्या मुळे त्यांनी लेखी राजीनामा दिला आहे त्या मध्ये त्यांनी म्हंटले आहे पक्षाच्या सर्व पदावरून पदमुक्त करावे अशी नम्र विनंती त्यांनी केली आहे साकी गायकवाड हे राष्ट्रवादी चे एकनिष्ठ पद्धतीने म्हणून महाराष्ट्र भर त्यांच्या कडे पाहिले जाते पक्षश्रेष्ठी त्यांचा राजीनामा स्वीकारणार का?