Deprecated: Function WP_Dependencies->add_data() was called with an argument that is deprecated since version 6.9.0! IE conditional comments are ignored by all supported browsers. in /home/x5zz1zyaiadw/public_html/wp-includes/functions.php on line 6131
Gold-Silver Price on 12 February 2023 : आज सोन्याच्या भावात वाढ की घट ; तर जाणून घ्या चांदीचा भाव - Maharashtra 24

Gold-Silver Price on 12 February 2023 : आज सोन्याच्या भावात वाढ की घट ; तर जाणून घ्या चांदीचा भाव

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । १२ फेब्रुवारी । Gold-Silver Price Today: १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याची किंमत आज रुपये ५२,६०० असून मागील ट्रेडमध्ये ह्या मौल्यवान धातूची किंमत ५२,४०० रुपये प्रति १० ग्रॅमवरवर ​​बंद झाली होती. गुड रिटर्न्स या वेबसाइटनुसार चांदी ७०,५०० रुपये प्रति किलोने विकली जात आहे. मागील ट्रेडमध्ये चांदीची किंमत ७१,८०० रुपये प्रतिकिलो होती. उत्पादन शुल्क, राज्य कर आणि मेकिंग शुल्कामुळे सोन्याच्या दागिन्यांच्या किंमती भारतभर बदलतात.

गुड रिटर्न्स वेबसाईटनुसार, पुण्यात प्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर ५२,६०० असेल तर २४ कॅरेट सोन्याचा दर ५७,३८० रुपये असेल. मुंबईमध्ये २२ कॅरेट सोन्याची किंमत प्रति १० ग्रॅम ५२,६०० रुपये आहे. मुंबईत २४ कॅरेट सोन्याची किंमत ५७,३८० प्रति १० ग्रॅम आहे. नागपूर मध्ये प्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर ५२,६०० तर २४ कॅरेट सोन्याचा दर ५७,३८० रुपये इतका असेल. नाशिकमध्ये २२ कॅरेट सोन्याचा दर ५२,६३० आहे तर प्रति १० ग्रॅम २४ कॅरेट सोन्याचा दर ५७,४१० रुपये आहे. चांदीचा आजचा प्रती १० ग्रॅमचा दर ७०५ रुपये आहे.

(वरील सोन्याचे दर सूचक आहेत आणि त्यात जीएसटी, टीसीएस आणि इतर करांचा समावेश नाही. अचूक दरांसाठी तुमच्या स्थानिक ज्वेलरशी संपर्क साधा.)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *