Pune Mumbai Expressway : मुंबई -पुणे एक्स्प्रेसवरून प्रवास करणाऱ्यासाठी महत्वाची बातमी

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । १२ फेब्रुवारी । मुंबई -पुणे एक्स्प्रेसवेवर पुणे लाईनवर पुण्याकडे जाणाऱ्या वाहनांना आज (दि.12) दुपारी 12 ते 3 वाजेपर्यंत वाहतूक बंदी करण्यात आली आहे. कळंबोली गावाजवळ ओव्हर हेड ग्रँट्री उभारण्याचे काम राज्य सरकारच्या रस्ते विकास महामंडळाने हाती घेतले आहे. यामुळे आज दुपारी 12 ते 3 वाजेपर्यंत कळंबोली गावापासून 500 ते 700 मिटर पर्यंत वाहतूक बंद करण्यात आली आहे.

संबधित वाहतूक कळंबोली गाव ते पनवेल सर्कल ते देवांश इन हॉटेल जवळून पनवेल रॅम्प पासून, पुन्हा एक्स्प्रेस मार्गे पुणेकडे वळवण्यात आली आहे. त्यामुळे या कालावधीत वाहनचालकांनी देवांश इन हॉटेल जवळून मार्गाचा वापर करावा असे आवाहन वाहतूक पोलिसांनी केले आहे. जर वाहन चालकांना काही अडचणी झाल्यास त्यांनी मुंबई पुणे एक्स्प्रेसच्या मदत कक्षाला संपर्क करण्याचे आवाहन केले आहे.

त्यासाठी त्यांनी 9822488224 या नंबर वर संपर्क करण्याचे आवाहन केले आहे. पोलीस विभागाच्या 9833498334 या दूरध्वनीवर देखील संपर्क करू शकता. असे आवाहन केले आहे. त्यामुळे मुंबईकडून येणाऱ्या वाहनचालकांनी खारघर क्रॉस केल्यावर सबंधित सूचनेकडे लक्ष देणे गरजेचे आहे.

महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने (एमएसआरडीसी) ही माहिती दिली आहे. एमएसआरडीसीने माहिती दिली आहे की ते पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावरील कळंबोली प्रवेशद्वार येथे ओव्हरहेडचे काम सुरू करणार आहेत, ज्यासाठी 12 फेब्रुवारी रोजी दुपारी वाहतूक वळवण्यात येईल. ओव्हरहेड गॅन्ट्रीबाबत बरेच दिवस काम सुरू आहे.

एमएसआरडीसीच्या म्हणण्यानुसार, पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर रविवारी दुपारी 12 ते 3 या वेळेत वाहतूक वळवण्यात येणार आहे. शुक्रवारी एमएसआरडीसीकडून सविस्तर परिपत्रक जारी करण्यात आले असून, त्यात वळवण्याच्या मार्गाचीही माहिती देण्यात आली आहे. परिपत्रकानुसार कळंबोलीहून पुण्याच्या दिशेने जाणारा रस्ता दुपारी बारा ते तीन वाजेपर्यंत बंद राहणार आहे. या कालावधीत कळंबोली गावाकडून पनवेल सर्कलकडे जाणारी वाहतूक पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावरील हॉटेल देवांशी इनकडे पनवेल रॅम्पमार्गे वळवण्यात येणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *