Accident News : पुण्यात पुन्हा अपघात स्थळ नवले ब्रिज ; ब्रेक फेल कंटेनरने दिली चार वाहनांना धडक

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । १२ फेब्रुवारी । पुण्यातील कात्रज आंबेगाव येथील नवले पुल परिसरातील अपघातांचे सत्र सुरूच आहे. नऱ्हे येथील सेवा रस्त्यावरील भूमकर पुल चौकात ब्रेक फेल झालेल्या एका कंटेनरने एकूण चार वाहनांना धडक दिल्याने दोन जण जखमी झाले आहेत. हि घटना काल (शनिवारी सायंकाळी) घडली. कंटेनरचालक पंकज महापात्रे (वय:५७, रा. उमरगा, जिल्हा उस्मानाबाद) याला सिंहगड रस्ता पोलिसांकडून ताब्यात घेण्यात आलं आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, शिरवळवरून फ्रिज आणि इतर साहित्य घेऊन निघालेल्या कंटेनरचे नऱ्हे येथील भूमकर पुलाजवळ सेवा रस्त्यावर आल्यानंतर कंटेनरचे ब्रेक अचानक निकामी झाले. त्यानंतर चौकात असणारे वाहतूक कर्मचारी माधव गोपनर, महेंद्र राऊत, सुशांत यादव या कर्मचाऱ्यांच्या लक्षात ही गोष्ट लक्षात आल्यानंतर त्यांनी इतर रस्त्याने येणारी वाहतूक थांबवल्याने मोठा अनर्थ टळला.

मात्र कंटेनर समोर जात असणाऱ्या दोन चारचाकी, एक तीनचाकी रिक्षा व एका दुचाकीला कंटेनरची धडक बसली. यामध्ये दोन जण जखमी झाले आहेत. घटनेनंतर परिसरातील नागरिकांनी कंटेनर चालकाला बेदम मारहाण केली. पोलिसांनी कंटेनर चालकाला ताब्यात घेतले असून इतर वाहनामधील जखमींना उपचारासाठी परिसरातील रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

दरम्यान हा अपघात संध्याकाळी घडला. यावेळी नऱ्हे रोडवर मोठी गर्दी असते. ऐन गर्दीच्या वेळी कंटेनरचे ब्रेक फेल झाल्याने एकच हाहाकार उडाला. या अपघातातील एका क्रेटा वाहनाला कंटेनरने पाठीमागून जोराची धडक दिल्याने क्रेटा हवेत उडाली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *